Apple Share : जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी ॲपलसाठी गुरुवारचा दिवस अत्यंत दुर्दैवी ठरला. शेअर बाजारात कंपनीच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांची मोठी घसरण झाल्यामुळे ॲपलने एकाच दिवसात तब्बल २०२ अब्ज डॉलर (सुमारे १८,२७६ अब्ज रुपये) इतके बाजार भांडवल गमावले आहे. २०२६ सालातील ही कंपनीची आतापर्यंतची सर्वात मोठी पडझड मानली जात असून, यामुळे जागतिक टेक मार्केटमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
'सिरि'च्या अपडेटमध्ये दिरंगाईॲपलच्या या घसरणीमागे 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' संदर्भातील आव्हाने मुख्य कारण असल्याचे मानले जाते. ॲपलच्या व्हॉईस असिस्टंट 'सिरि'च्या नवीन एआय अपडेटला पुन्हा एकदा विलंब होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कंपनीने हे अपडेट आधीच २०२६ पर्यंत लांबणीवर टाकले होते. ॲपल आपल्या सिरि अपडेटसाठी गुगलच्या 'जेमिनी' मॉडेलचा वापर करण्याची शक्यता आहे. परंतु, हे फिचर्स टप्प्याटप्प्याने दिले जाणार असल्याने गुंतवणूकदारांचा उत्साह मावळला आहे.
'ॲपल न्यूज'वर सरकारी टांगती तलवारकेवळ तांत्रिक कारणेच नाही, तर कायदेशीर कचाट्यामुळेही शेअर कोसळले आहेत. अमेरिकन फेडरल ट्रेड कमिशनने 'ॲपल न्यूज' ॲपच्या अटी आणि शर्तींची समीक्षा करण्याचे आदेश सीईओ टिम कुक यांना दिले आहेत. ॲपमधील मजकूर निवडीबाबत पारदर्शकता नसल्याचा आरोप कंपनीवर होत असून, यामुळे रेग्युलेटरी तपास वाढण्याची शक्यता आहे.
इतिहासातील दुसरी मोठी घसरणडाऊ जोन्सच्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२५ नंतरची ही ॲपलच्या शेअर्समधील सर्वात मोठी घसरण आहे. कंपनीच्या इतिहासातील ही एका दिवसातील दुसरी सर्वात मोठी 'व्हॅल्यू' घसरण ठरली आहे. यापूर्वी ३ एप्रिल २०२५ रोजी टॅरिफशी संबंधित घोषणेनंतर कंपनीने ३११ अब्ज डॉलर गमावले होते. या एका झटक्यामुळे गेल्या वर्षभरातील शेअर्समधील वाढ जवळपास पुसली गेली आहे.
वाचा - श्रीमंत व्हायचंय? मग आजच सुरू करा १० नियमांचे पालन; कर्जातून मुक्ती आणि बचतीची खात्री!
तरीही बाजारावर पकड कायमइतका मोठा झटका बसूनही ॲपलची कामगिरी इतर आघाड्यांवर समाधानकारक आहे. १४ वर्षांनंतर ॲपलने सॅमसंगला मागे टाकत 'टॉप सेलिंग ब्रँड'चे स्थान पटकावले आहे. मर्यादित मॉडेल्स असूनही ॲपलची मागणी जागतिक बाजारपेठेत मजबूत असून कंपनीने नुकताच मोठा नफाही नोंदवला आहे.
Web Summary : Apple's shares plunged, wiping out $202 billion due to AI Siri update delays and regulatory scrutiny. It's the second-largest single-day value drop in Apple's history, despite strong overall market performance.
Web Summary : एप्पल के शेयरों में गिरावट, एआई सिरी अपडेट में देरी और नियामक जांच के कारण 202 बिलियन डॉलर का नुकसान हुआ। यह एप्पल के इतिहास में एक दिन में दूसरी सबसे बड़ी गिरावट है, फिर भी बाजार प्रदर्शन मजबूत है।