Join us

रिलायन्ससह टॉप १० पैकी ८ कंपन्यांचे २.२५ लाख कोटी रुपये बुडाले; फक्त 'या' २ कंपन्यांनीच कमावला मोठा नफा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 13:15 IST

Share Market : देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मार्केट कॅपला सर्वाधिक फटका बसला आहे. या आठवड्यात कंपनीच्या मूल्यांकनात ७०,७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा झाला आहे.

Share Market : डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या आयात शुल्काचा (टॅरिफ) मोठा फटका भारतीय शेअर बाजाराला बसला आहे. ऑगस्टचा शेवटचा आठवडा शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी मोठा नुकसानीचा ठरला आहे. या आठवड्यात शेअर बाजारात लिस्टेड देशातील टॉप १० कंपन्यांपैकी ८ कंपन्यांचे बाजार भांडवल सुमारे २.२५ लाख कोटी रुपयांनी घटले आहे. यामध्ये सर्वात जास्त नुकसान रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँकेला झाले आहे.

सर्वाधिक नुकसान कोणाला?

  1. रिलायन्स इंडस्ट्रीज: देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल ७०,७०७.१७ कोटी रुपयांनी घटून १८,३६,४२४.२० कोटी रुपयांवर आले.
  2. एचडीएफसी बँक: देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेचे मूल्यांकन ४७,४८२.४९ कोटी रुपयांनी घटून १४,६०,८६३.९० कोटी रुपयांवर आले.
  3. आयसीआयसीआय बँक: या बँकेचे बाजार भांडवल २७,१३५.२३ कोटी रुपयांनी घटून ९,९८,२९०.९६ कोटी रुपयांवर आले.
  4. भारती एअरटेल: देशातील सर्वात मोठी लिस्टेड टेलिकॉम कंपनी असलेल्या भारती एअरटेलचे बाजार भांडवल २४,९४६.७१ कोटी रुपयांनी कमी झाले.
  5. एलआयसी: सर्वात मोठ्या विमा कंपनीचे मूल्यांकन २३,६५५.४९ कोटी रुपयांनी घटले.
  6. भारतीय स्टेट बँक (एसबीआय): देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेचे मूल्यांकन १२,६९२.१ कोटी रुपयांनी घटून ७,४०,६१८.६० कोटी रुपये झाले.
  7. बजाज फायनान्स: कंपनीच्या बाजार भांडवलात १०,४७१.०८ कोटी रुपयांची मोठी घट झाली.
  8. इन्फोसिस: या कंपनीलाही मोठे नुकसान झाले असून, त्यांचे बाजार भांडवल ७,५४०.१८ कोटी रुपयांनी घटले.

या दोन कंपन्यांना झाला फायदाज्यावेळी शेअर बाजारात घसरण सुरू होती, त्यावेळी काही कंपन्यांनी मात्र सकारात्मक कामगिरी केली. यामध्ये दोन मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.

  1. टीसीएस (TCS): देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसच्या बाजार भांडवलात ११,१२५.६२ कोटी रुपयांची वाढ झाली, ज्यामुळे त्याचे एकूण मूल्यांकन ११,१५,९६२.९१ कोटी रुपयांवर पोहोचले.
  2. हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL): देशातील सर्वात मोठ्या एफएमसीजी कंपनीच्या बाजार भांडवलात ७,३१८.९८ कोटी रुपयांची वाढ झाली.

वाचा - भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होणार; RBI गव्हर्नर मल्होत्रांचा मोठा दावा, कुणाला दिलं श्रेय?

एकूणच, आठवडाभरात सेन्सेक्समध्ये सुमारे २ टक्के घट दिसून आली. तज्ज्ञांनुसार, पुढील आठवड्यातही शेअर बाजारात चढ-उतार राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटरिलायन्सएचडीएफसी