Government Pension Scheme : जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे! आता तुम्हाला सरकारकडून आणखी एका मोठ्या योजनेचा लाभ मिळू शकतो, ती म्हणजे पीएम किसान मानधन पेन्शन योजना. या योजनेअंतर्गत, तुम्हाला दरवर्षी मिळणाऱ्या ६००० रुपयांसोबतच, उतारवयात दरमहा ३००० रुपये म्हणजेच वार्षिक ३६,००० रुपये पेन्शन मिळू शकते. विशेष म्हणजे, यासाठी तुम्हाला वेगळे पैसे किंवा जास्त कागदपत्रे देण्याची गरज नाही.
पेन्शन कशी मिळेल?
- पीएम किसान योजनेशी संबंधित १८ ते ४० वयोगटातील शेतकरी या पेन्शन योजनेत नोंदणी करू शकतात.
- ६० वर्षांनंतर तुम्हाला दरमहा ३००० रुपये पेन्शन मिळेल.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या पेन्शन योजनेसाठी लागणारे पैसे तुमच्या पीएम किसानच्या ६००० रुपयांमधूनच थेट कापले जातील.
- उदा. जर तुम्ही वयाच्या ४० व्या वर्षी दरमहा २०० रुपये योगदान निवडले, तर तुमच्या ६००० रुपयांमधून दरवर्षी २४०० रुपये कापले जातील आणि उरलेले ३६०० रुपये तुमच्या खात्यात जमा होतील.
नोंदणी कशी करावी?
- या योजनेत नोंदणी करणे खूप सोपे आहे.
- तुमच्या जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रात (CSC) जा.
- तुमच्यासोबत आधार कार्ड, बँक पासबुक, जमिनीची कागदपत्रे आणि पासपोर्ट आकाराचा फोटो घेऊन जा.
- CSC ऑपरेटर तुमच्या माहितीनुसार ऑनलाइन फॉर्म भरेल आणि ऑटो-डेबिट फॉर्मही भरेल, ज्यामुळे मासिक योगदान तुमच्या बँक खात्यातून आपोआप कापले जाईल.
- नोंदणी झाल्यावर तुम्हाला एक युनिक पेन्शन आयडी नंबर मिळेल.
वाचा - ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
पीएम किसानचा २० वा हप्ता आलापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच २ ऑगस्ट २०२५ रोजी देशभरातील ९.७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा २० वा हप्ता जमा केला आहे. जर तुम्ही पीएम किसानचे लाभार्थी असूनही तुम्हाला हप्ता मिळाला नसेल, तर pmkisan.gov.in या वेबसाइटवर जाऊन तुमचे नाव तपासू शकता आणि आवश्यक माहिती अपडेट करू शकता.