Join us

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५ वर्षांत मिळवा ५ लाख रुपये व्याज! मुलांच्या नावावरही करू शकता गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 17:03 IST

Post Office Scheme : कोणतीही जोखीम न घेता चक्रवाढ पद्धतीने पैसे वाढवायचे असेल तर पोस्ट ऑफिसची ही योजना तुमच्यासाठी बेस्ट आहे.

Post Office Scheme : जागतिक अनिश्चित वातावरणात शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम प्रचंड वाढली आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीला असे वाटते की, आपल्या कमाईचा काही भाग अशा सुरक्षित ठिकाणी गुंतवावा, जिथे त्याचे पैसे सुरक्षित राहतील आणि त्यावर चांगला परतावा देखील मिळेल. जर तुम्ही असा एखादा पर्याय शोधत असाल जो सरकारी हमीसह उत्तम व्याज देईल, तर पोस्ट ऑफिसची नॅशनल सेविंग्स सर्टिफिकेट योजना तुमच्यासाठी एक सर्वोत्तम पर्याय ठरू शकते.

एनएससी ही पोस्ट ऑफिसची एक छोटी बचत योजना आहे. या योजनेची सर्वात खास गोष्ट म्हणजे यामध्ये मिळणारे व्याज दरवर्षी चक्रवाढ पद्धतीने वाढत जाते. सध्या या योजनेवर ७.७% वार्षिक व्याज मिळत आहे, जे कंपाउंडिंगमुळे खूप फायदेशीर ठरते.

५ वर्षांत ५ लाख कसे कमवाल?आता प्रश्न येतो की या योजनेत ५ वर्षांत ५ लाख रुपये कसे कमावता येतील? याचे गणित खूप सोपे आहे.जर तुम्ही या योजनेत एकाच वेळी ११ लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर ५ वर्षांनंतर चक्रवाढ व्याजासह तुम्हाला १५,९३,९३७ रुपये मिळतील.याचाच अर्थ, तुम्हाला ४,९३,९३७ रुपयांचे व्याज मिळेल. म्हणजेच, तुम्ही जवळपास ५ लाख रुपयांचा फायदा केवळ ५ वर्षांत मिळवू शकता, तोही कोणत्याही जोखमीशिवाय.

छोटी रक्कमही पुरेशी आहे

  • जर तुमच्याकडे मोठी रक्कम नसेल, तरी काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही कमी रकमेतूनही सुरुवात करू शकता. यात मुलांच्या नावानेही खाते उघडता येते, जे त्यांचे पालक ऑपरेट करू शकतात.
  • तुम्ही किमान १,००० रुपयांपासून खाते उघडू शकता.
  • यामध्ये गुंतवणूक करण्याची कोणतीही कमाल मर्यादा नाही.
  • ही योजना ५ वर्षांसाठी असते. पूर्ण फायदा घेण्यासाठी तुम्हाला किमान ५ वर्षे पैसे ठेवावे लागतील.

वाचा - लग्नानंतर आधार कार्डवरील नाव कसे बदलावे? सोपी ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रक्रिया जाणून घ्या

टॅक्समध्येही मिळेल सूटया योजनेचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे, यामध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम ८०सी (80C) अंतर्गत कर सूट मिळते. तुम्ही एका आर्थिक वर्षात १.५ लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर टॅक्स वाचवू शकता.

टॅग्स :पोस्ट ऑफिसगुंतवणूकशेअर बाजारपैसा