Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 19:32 IST

India-Afghanistan Trade : अफगाणिस्तानचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री अलहाज नूरुद्दीन अजीजी यांनी भारतीय कंपन्यांना ही ऑफर दिली आहे.

India-Afghanistan Trade : अफगाणिस्तानचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री अलहाज नूरुद्दीन अजीजी यांनी भारताला त्यांच्या देशात मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचे आमंत्रण दिले आहे. विशेषतः गोल्ड मायनिंग (सोन्या-खण) क्षेत्रात गुंतवणुकीसाठी भारतीय कंपन्यांना पाच वर्षांची पूर्ण करमाफी आणि गुंतवणुकीसाठी लागणाऱ्या मशिनरीवर फक्त 1% आयात शुल्काची ऑफिर दिली आहे. अजीजी नवी दिल्लीतील ASSOCHAM आयोजित संवाद सत्रात बोलत होते.

अफगाणिस्तानमध्ये अपार क्षमता; स्पर्धकही कमी...

अजीजी म्हणाले, अफगाणिस्तानमध्ये गुंतवणुकीची अपार संधी आहे. भारतीय कंपन्यांना पूर्ण टॅरिफ सपोर्ट दिला जाईल आणि जमीन उपलब्ध करून दिली जाईल. गुंतवणूक करणार्‍या कंपन्यांसाठी स्पर्धादेखील खूप कमी आहे.

गोल्ड मायनिंगवर विशेष भर

अजीजींनी स्पष्ट केले की, सोन्याच्या खाणीसाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि व्यावसायिक कंपन्यांची आवश्यकता आहे. त्यांनी अट घातली की, खाणीतून बाहेर काढलेल्या सोन्याचे प्रोसेसिंगही अफगाणिस्तानातच केले गेले पाहिजे, जेणेकरुन स्थानिक रोजगार निर्माण होतील.

व्हिसा, एअर कॉरिडोर, बँकिंग समस्या दूर करा

द्विपक्षीय व्यापार वाढवण्यासाठी काही छोट्या पण महत्त्वाच्या अडचणी दूर करण्याची विनंती अजीजींनी भारतीय अधिकाऱ्यांसमोर केली. ते म्हणाले, भारत व अफगाणिस्तान यांच्यातील संबंध सुधारत आहेत. व्हिसा, एअर कॉरिडोर आणि बँकिंग व्यवहारातील अडथळे व्यापार प्रक्रियेवर परिणाम करतात. हे दूर केल्यास द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढू शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : Afghanistan woos Indian gold mining investors with tax breaks.

Web Summary : Afghanistan invites Indian investment in gold mining, offering a five-year tax exemption and minimal import duties. Minister Azizi highlighted vast potential, tariff support, and land availability, urging India to resolve visa and banking hurdles for boosted trade.
टॅग्स :सोनंअफगाणिस्तानभारतव्यवसाय