Gold Rate Today : दिवाळीनंतर सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. आता लग्नसराईचा हंगाम पुन्हा सुरू झाला आहे. जर तुम्ही या सिझनमध्ये सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आज, रविवार (१६ नोव्हेंबर २०२५) असल्यामुळे सराफा बाजारातील सोन्या-चांदीच्या दरात कोणताही मोठा बदल झालेला नाही, दर स्थिर आहेत.
इंडिया बुलियनच्या आकडेवारीनुसार, आज सकाळी १०:१५ वाजेपर्यंत २४ कॅरेट सोन्याचा दर १,२३,९१० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २२ कॅरेट सोन्याचा दर १,१३,५८४ रुपये प्रति १० ग्रॅम नोंदवला गेला. तर, चांदीचा दर (९९९ फाइन) १,५६,१८० रुपये प्रति किलो होता.
आज प्रमुख शहरांतील सोन्याचे भाव (₹/१० ग्रॅम)मुंबई, दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद आणि चेन्नईसह प्रमुख शहरांमधील सोन्या-चांदीचे आजचे दर खालीलप्रमाणे आहेत:
| शहर | २४ कॅरेट सोने (₹/१० ग्रॅम) | २२ कॅरेट सोने (₹/१० ग्रॅम) | चांदी बुलियन (₹/किलो) |
| मुंबई | १,२३,६९० | १,१३,३८३ | १,५५,८९० |
| दिल्ली | १,२३,४७० | १,१३,१८१ | १,५५,६२० |
| कोलकाता | १,२३,५२० | १,१३,२२७ | १,५५,६९० |
| अहमदाबाद | १,२३,८५० | १,१३,५२९ | १,५६,१०० |
| बंगळूरु | १,२३,७९० | १,१३,४७४ | १,५६,०२० |
| हैदराबाद | १,२३,८८० | १,१३,५५७ | १,५६,१४० |
सोन्यातील गुंतवणूक आणि परतावामागील दोन दशकांत सोन्याच्या किमतीत जबरदस्त वाढ झाली आहे. सन २००५ मध्ये ७,६३८ रुपये असलेला सोन्याचा दर सप्टेंबर २०२५ मध्ये १,२५,००० रुपयांच्या पुढे गेला आहे, म्हणजेच सुमारे १,२००% ची वाढ झाली आहे.
या काळात सोन्याने अनेक वर्षांत सकारात्मक परतावा दिला आहे.चालू वर्षात सोन्याच्या किमतीत ५६% ची वाढ नोंदवली गेली आहे, ज्यामुळे सोने आजही सर्वात विश्वासार्ह गुंतवणूक पर्यायांपैकी एक मानले जाते.
वाचा - १८ व्या वर्षी तुमचं मुल होईल कोट्यधीश! SSY, NPS आणि PPF सह 'या' ६ योजनांमध्ये आजच करा गुंतवणूक
टीप : ग्राहकांनी लक्षात ठेवावे की ज्वेलर अंतिम बिलात मेकिंग चार्ज (घडणावळ शुल्क), विविध कर आणि जीएसटी जोडतात. त्यामुळे बाजारात सांगितलेल्या दरांपेक्षा तुमच्या सोन्याची प्रत्यक्ष खरेदी किंमत अधिक असू शकते.
Web Summary : Gold rates are steady today. 24 Carat gold is ₹1,23,910 per 10 grams. Investing in gold has yielded significant returns, with prices rising dramatically since 2005. Consider making charges and taxes when purchasing.
Web Summary : आज सोने की दरें स्थिर हैं। 24 कैरेट सोना ₹1,23,910 प्रति 10 ग्राम है। सोने में निवेश ने 2005 से कीमतों में भारी वृद्धि के साथ महत्वपूर्ण रिटर्न दिया है। खरीदते समय मेकिंग चार्ज और टैक्स पर विचार करें।