Join us

Apple ची गरुडझेप; भारताच्या GDP इतके झाले कंपनीचे मूल्य, पाहा आकडा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 18:31 IST

अॅपलचे शेअर्स मंगळवारी 258.20 डॉलर्सच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले.

Apple MarketCap : iPhone आणि Macbook बनवणारी दिग्गज टेक कंपनी Apple चे मार्केट कॅप $ 4 ट्रिलियन (सुमारे 332 लाख कोटी रुपये) च्या जवळ पोहोचले आहे. हा टप्पा गाठणारी Apple ही जगातील पहिली कंपनी ठरली आहे. विशेष म्हणजे, भारताचा GDP सध्या 331 लाख कोटी रुपये आहे. म्हणजेच, ॲपलचे मूल्य भारताच्या जीडीपीच्या पुढे गेले आहे.

ॲपलचे शेअर्स विक्रमी उच्चांकावर Apple चे शेअर्स मंगळवारी $258.20 वर पोहोचले, जो या शेअरचा सर्वकालीन उच्चांक आहे. त्यात गेल्या 6 महिन्यांत 23 टक्के आणि एका वर्षात सुमारे 34 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वाढीमुळे कंपनीचे मार्केट कॅप सूमारे $4 ट्रिलियनवर पोहोचले आहे. ॲपल कंपनी जगातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. केवळ अमेरिका, चीन, फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, जपान आणि भारताचा जीडीपी ॲपलपेक्षा जास्त आहे. दरम्यान, अमेरिकेच्या GDP मध्ये Apple चा वाटा 13 टक्के आहे.

भारताचा GDP किती आहे?2000 साली भारताचा GDP सुमारे $468 अब्ज होता. हा अवघ्या सात वर्षांत, म्हणजेच 2007 मध्ये एक ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचला. पुढील सात वर्षांत हा दोन ट्रिलियन डॉलर्स झाला. आता 2024 मध्ये भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. आपल्या जीडीपीचा आकार 3.89 ट्रिलियन डॉलर आहे. हे अंदाजे 331 लाख कोटी रुपये आहे. 2027-2028 पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर्सच्या जीडीपीसह जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे भारताचे पुढील लक्ष्य आहे.

अॅपलची कमाई?Apple ने 2023-24 मध्ये अंदाजे $ 391 अब्ज (सुमारे 33 लाख कोटी रुपये) कमावले. युरोपियन देशांमधून अॅफचली 26 टक्के कमाई होते. ॲपलच्या एकूण व्यवसायात चीनचा वाटा 17 टक्के आणि भारताचा वाटा 2 टक्के आहे.

टॅग्स :अॅपलभारतअर्थव्यवस्थाशेअर बाजार