Join us
Daily Top 2Weekly Top 5

महागाईचा 'डबल डोस'! इंधनापाठोपाठ झोमॅटोची डिलिव्हरी महागली; प्लॅटफॉर्म फीमध्ये १९% वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 16:36 IST

Zomato Hike Platform Fees : झोमॅटोने आपले 'प्लॅटफॉर्म शुल्क' प्रति ऑर्डर २.४० रुपयाने वाढवले ​​आहे, ज्यामुळे ग्राहकांवर अतिरिक्त बोजा पडणार आहे.

Zomato Hike Platform Fees : पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीचे चटके आता थेट भारतीय ग्राहकांच्या खिशाला बसू लागले आहेत. एकीकडे तेल कंपन्यांनी प्रीमियम पेट्रोलच्या दरात वाढ करून वाहनधारकांना धक्का दिला असतानाच, दुसरीकडे ऑनलाईन फूड डिलिव्हरी क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'झोमॅटो'ने आपल्या प्लॅटफॉर्म फीमध्ये वाढ केली आहे. यामुळे आता घरबसल्या जेवण मागवणे सर्वसामान्यांसाठी अधिक महाग झाले असून, जीवनावश्यक वस्तूंपाठोपाठ सेवा क्षेत्रातील महागाईनेही डोके वर काढले आहे.

झोमॅटोचा ग्राहकांना 'झटका'झोमॅटोने आपल्या प्लॅटफॉर्म फीमध्ये प्रति ऑर्डर २.४० रुपयांची वाढ केली आहे. या दरवाढीनंतर आता ग्राहकांना प्रत्येक ऑर्डरवर १४.९० रुपये प्लॅटफॉर्म फी द्यावी लागेल.

  • जुना दर : १२.५० रुपये.
  • नवीन दर : १४.९० रुपये.
  • शेवटची दरवाढ : सप्टेंबर २०२५ मध्ये करण्यात आली होती.

विशेष म्हणजे, झोमॅटोची मुख्य स्पर्धक कंपनी 'स्विगी' आधीपासूनच करासह १४.९९ रुपये प्लॅटफॉर्म फी आकारत आहे. झोमॅटोच्या या निर्णयामुळे आता दोन्ही प्रमुख कंपन्यांचे चार्जेस जवळपास समान झाले आहेत.

१९.२ टक्क्यांनी महागली सेवाप्लॅटफॉर्म फी म्हणजे असा चार्ज जो कंपन्या त्यांच्या ॲपची देखभाल आणि सेवा अखंडित ठेवण्यासाठी ग्राहकांकडून वसूल करतात. हा खर्च अन्नाची किंमत, जीएसटी आणि डिलिव्हरी पार्टनर फी यांच्यापेक्षा वेगळा असतो. टक्केवारीच्या हिशोबात पाहिल्यास, झोमॅटोने आपल्या शुल्कात सुमारे १९.२ टक्क्यांची मोठी वाढ केली आहे.

खिशावर काय होणार परिणाम?प्रथमदर्शनी २.४० रुपयांची वाढ किरकोळ वाटत असली, तरी महिन्याला १० ते १५ वेळा ऑनलाईन जेवण मागवणाऱ्या ग्राहकांसाठी ही मोठी रक्कम ठरते.वारंवार ऑर्डर करणाऱ्यांच्या मासिक खर्चात यामुळे वाढ होईल. हाय-ऑक्टेन पेट्रोलच्या किमतीत २.३० रुपयांची वाढ झाल्याने आधीच वाहतूक खर्च वाढला आहे, त्यात आता जेवणही महागले आहे.कंपनीने केवळ प्लॅटफॉर्म फी वाढवली असून डिलिव्हरी चार्जेसमध्ये सध्या कोणताही बदल केलेला नाही. हे पाऊल झोमॅटोचा महसूल आणि नफा वाढवण्यासाठी उचलले गेल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

वाचा - उर्जा संकट रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मास्टर प्लॅन तयार? डेटा लपवल्यास आता थेट तुरुंगवास!इंधन दरवाढ आणि प्लॅटफॉर्म फीमधील वाढ हे संकेत आहेत की जागतिक अस्थिरतेचा परिणाम आता आपल्या 'लाईफस्टाईल' खर्चावर होत आहे. अन्न आणि इंधन या दोन मूलभूत गरजा महागल्यामुळे एप्रिल महिन्याचे कौटुंबिक बजेट विस्कळीत होण्याची शक्यता आहे. ग्राहकांनी आता घरबसल्या ऑर्डर करण्यापूर्वी या अतिरिक्त शुल्काचा विचार करणे गरजेचे आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Double Whammy: Fuel Hike Followed by Zomato Delivery Fee Increase

Web Summary : Zomato increased its platform fee by ₹2.40 per order, now ₹14.90. This follows a hike in fuel prices, impacting consumers' monthly budget. The 19.2% fee increase adds to the cost of online food delivery, mirroring competitor Swiggy's charges.
टॅग्स :झोमॅटोइंधन टंचाईइंधन दरवाढएलपीजी गॅस टंचाई