Join us  

अनिल अंबानींच्या रिलायन्सवर नामुष्की, कर्ज थकल्याने ही बँक जप्त करणार हेडक्वार्टर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 11:31 AM

एकेकाळी उद्योग क्षेत्रात आघाडीवर असलेले आणि देशातील श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश असलेले अनिल अंबानी गेल्या काही वर्षांपासून आर्थिक समस्यांचा सामना कत आहेत.

ठळक मुद्देअनिल अंबानीं यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्सला अजून एक धक्का बसण्याची शक्यताकर्ज थकल्याने यस बँकेने अनिल अंबानींच्या रिलायन्स समुहाविरोधात कठोर कारवाई रिलायन्सचे मुंबईतील सांताक्रूझ येथील कार्यालय जप्त करण्यासाठी पाठवली नोटीस ऑफ पझेशन

मुंबई - सध्या मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या अनिल अंबानीं यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्सला अजून एक धक्का बसण्याची शक्यता आहे. कर्ज थकल्याने यस बँक अनिल अंबानींच्यारिलायन्स समुहाविरोधात कठोर कारवाई केली असून, रिलायन्सचे मुंबईतील सांताक्रूझ येथील कार्यालय जप्त करण्यासाठी नोटीस ऑफ पझेशन पाठवली आहे. बँकेने रिलायन्सच्या मुख्यालयासोबतच मुंबईतील अन्य दोन कार्यालयांनाही अशा प्रकारची नोटीस पाठवली आहे.

एकेकाळी उद्योग क्षेत्रात आघाडीवर असलेले आणि देशातील श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश असलेले अनिल अंबानी गेल्या काही वर्षांपासून आर्थिक समस्यांचा सामना कत आहेत. दरम्यान, या कारवाईबाबत यस बँकेने सांगितले की, रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चरला बँकेने  २ हजार ८९२ कोटी रुपयांचे कर्ज गिले होते. आता त्या कर्जाच्या वसुलीसाठी ही प्रक्रिया क्रमवारपद्धतीने अवलंबणात आली आहे. दरम्यान, बँकेने नागिन महाल येथील रिलायन्सच्या कार्यालयाचे दोन मजले आपल्या ताब्यात घेतले आहेत. थकबाकीदाराची संपत्ती जप्त करून त्याची विक्री करून आपल्या कर्जाची भरपाई करण्याचा बँकेला अधिकार आहे, असे ही बँकेने स्पष्ट केले.

  दरम्यान, यस बँकसुद्धा सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. बँकेवर बॅड लोनचे ओझे वाढले असून, हे ओझे कम करण्यासाठी बँक प्रयत्नशील आहे. अनिल अंबानी ग्रुपवर कंपनीचे सुमारे १२ हजार रुपये बाकी आहेत. या कारवाईपूर्वी रिलायन्स ग्रुपला ६० दिवसांची नोटीस पाठवण्यात आली होती. त्याची मुदत ५ मे रोजी संपुष्टात आली होती. मात्र कंपनी या कर्जाचा भरणा करण्यात अपयशी ठरली. त्यामुळे  बँकेने नियमानुसार ही कारवाई केली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला 

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल 

टॅग्स :अनिल अंबानीरिलायन्सयेस बँक