आज केद्राचा अर्थसंकल्प सादर झाला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपला नववा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी कृषी क्षेत्राला 'बूस्ट' देण्यासाठी 'भारत विस्तार' (Bharat VISTAAR) या महत्त्वाकांक्षी एआय टूलची घोषणा केली. या टूलच्या सहाय्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. महत्वाचे म्हणजे, या अर्थसंकल्पात सीतारमण यांनी आपल्या भाषणात सर्वच क्षेत्रांत तंत्रज्ञान आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) वापरावर विशेष भर दिल्याचे दिसून आले.
काय आहे भारत विस्तार AI? -'भारत विस्तार' (वर्च्युअली इंटिग्रेटेड सिस्टम टू ॲक्सेस ॲग्रीकल्चरल रिसोर्स) हे एक एआय-आधारित पब्लिक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आहे. जे बहुभाषिक असून, याच्या सह्यायाने शेतकरी आपल्य भाषेत पिकांशी संबंधित माहिती मिळवू शकतील. याद्वारे सरकारी योजनांच्या माहिती बरोबरच, पिकांची उत्पादकता आणि जोखीम आदीसंदर्भातही शेतकरी माहिती मिळवून निर्णय घेऊ शकतील.
सरकार 'कृषी साथी एआय' चॅटबॉट लाँच करणार - महत्वाचे म्हणजे, हे टूल युनिफाइड सिस्टीम आणि टेस्टिंगची माहिती देणारे चॅटबॉट म्हणून कार्य करेल. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने 'कृषी साथी एआय' (Krishi Saathi AI) चॅटबॉट देखील लाँच केला आहे. याद्वारे शेतकरी व्हॉईस चॅटिंगद्वारे आपल्या समस्या सोडवू शकतील.
आयसीएआर (ICAR) च्या माध्यमातून भारत विस्तार एआय टूल शेतकऱ्यांना टेस्टिंग संदर्भात माहितीही देईल. यासंदर्भात सरकार पायलट टेस्टिंग करत आहे. ज्यामुळे शेतकरी भविष्यातील पिकांच्या लागवडीसंदर्भात निर्णय घेऊ शकतात. महत्वाचे म्हणजे, आयसीएआर शेतकऱ्यांना पीक लागवडीसंदर्भात सल्लाही देईल.
Web Summary : The Bharat Vistar AI tool, unveiled in the budget, aims to double farmer income. This multilingual platform provides farmers with crop information, government scheme details, and risk assessments. The Krishi Saathi AI chatbot will offer voice-based support and testing information via ICAR.
Web Summary : बजट में अनावरण किया गया भारत विस्तार एआई टूल, किसानों की आय को दोगुना करने का लक्ष्य रखता है। यह बहुभाषी मंच किसानों को फसल की जानकारी, सरकारी योजनाओं के विवरण और जोखिम आकलन प्रदान करता है। कृषि साथी एआई चैटबॉट आईसीएआर के माध्यम से आवाज-आधारित सहायता और परीक्षण जानकारी प्रदान करेगा।