Join us

Vijay Mallya: विजय माल्ल्याकडून धनत्रयोदशीच्या शुभेच्छा, नेटीझन्सनं चांगलाच ट्रोल केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2022 13:31 IST

सर्वोच्च न्यायालयाने माल्ल्यांना 40 दशलक्ष अमेरिकन डॉलर परत जमा करण्यास सांगितले. तसे न केल्यास मालमत्ता जप्त केली जाईल, असाही इशारा दिला होता

भारतीय बँकांचं कर्ज न फेडता देश सोडून उद्योगपती विजय माल्ल्या लंडनमध्ये स्थायिक झालेआहेत. विशेष म्हणजे येतील युके हायकोर्टातही त्यांचा खटला सुरू असून एका महत्त्वाच्या खटल्यात ते पराभूत झाले आहेत. त्यांचं लडनमधलं घरं बँक जप्त होऊ शकतं, असं कोर्टानं जानेवारी महिन्यात सांगितलं होतं.स्विस बँक यूबीएस बरोबर सुरू असलेल्या वादावर जानेवारी महिन्यात व्हर्च्युअली सुनावणी झाली होती. म्हणजेच एकंदरीत भारतासह लंडनमध्ये विजय माल्ल्या हे संपती घोटाळ्यावरुन वादात अडकले आहेत. मात्र, दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याने ते आता चांगलेच ट्रोल झाले आहेत. 

सर्वोच्च न्यायालयाने माल्ल्यांना 40 दशलक्ष अमेरिकन डॉलर परत जमा करण्यास सांगितले. तसे न केल्यास मालमत्ता जप्त केली जाईल, असाही इशारा दिला होता. माल्ल्या मार्च 2016 ला भारत सोडून ब्रिटनला गेले होते. त्यांनी किंगफिशर या एअरलाईन कंपनीसाठी बँकांकडून कर्ज घेतलं आणि ते न फेडताच विदेशात निघून गेले, असा त्यांच्यावर आरोप आहे. कर्जाची ही रक्कम जवळपास 10 हजार कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. किंगफिशर एअरलाइन अत्यंत दूरवस्थेनंतर बंद झाली होती. देशातील बँकांचे पैसे बुडवून लंडनमध्ये ऐशोआरामात राहणाऱ्या विजय माल्ल्याविरोधात देशातील नागरिकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळतो. 

लंडनमध्ये यापूर्वी क्रिकेटचा सामना पाहण्यास आल्यानंतरही विजय माल्ल्याला भारतीय क्रिकेटप्रेमींना हुसकावले होते, माल्ल्याविरोधात घोषणाबाजी केली होती. आता विजय माल्ल्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन धनत्रयोदशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यावरुन, नेटीझन्सने त्यास चांगलंच ट्रोल केलं आहे. रावण वाईट होता, पण त्याने कधी बँकेंचे पैसे बुडवले नाहीत, असे मिम्स माल्ल्यांस प्रतिउत्तरात ट्विट केले आहेत. 

माल्ल्याने यापूर्वी ५ ऑक्टोबर रोजी बंगाली मित्रांना शुभो बिजोया म्हणत शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच, सर्वांना दसऱ्याच्याही शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर, २२ ऑक्टोबर रोजी ट्विट करुन सर्वांना धनत्रयोदशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यावरुन, नेटीझन्सने माल्ल्याला चांगलंच सुनावलं आहे. 

 

टॅग्स :विजय मल्ल्याट्विटरदिवाळी 2022सोशल मीडियाबँक