Join us

Petrol And Diesel Price Update: पेट्रोल-डिझेलचे भाव कमी होणार? निर्मला सीतारामन यांचे मोठे विधान; म्हणाल्या, दर १५ दिवसांनी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 19:40 IST

वाढलेल्या इंधनदरामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झालेल्या असताना निर्मला सीतारामन यांनी केलेले विधान महत्त्वाचे मानले जात आहे.

Petrol And Diesel Price Update: इंधन दरवाढीमुळे देशातील जनता त्रस्त झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमतींचा परिणाम महागाईवरही होत असून, सर्वसामान्य जनतेच्या खिशावरील भार दिवसेंदिवस वाढत चालल्याचे सांगितले जात आहे. अशातच केंद्रीय अर्थममंत्री निर्मला सीतारामन यांनी इंधरदराबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. गेल्या ६ महिन्यांहून अधिक काळ पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. पण आता सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या अनेक दिवसांपासून कच्चा तेलाचे दर कमी आहेत. नोव्हेंबर महिन्यात क्रूड ऑईलच्या किंमतीत ७ टक्क्यांची घसरण दिसून आली. त्यामुळे केंद्र सरकारवर किंमती कमी करण्यासाठी दबाव आणला जात आहे. केंद्र सरकार आता प्रत्येक १५ दिवसानंतर इंधनावरील कराचा आढावा घेणार आहे. केंद्र सरकार कच्चे तेल, पेट्रोल-डिझेलच्या किंमती, विमान इंधन यांच्यावरील कराचा आढावा घेणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री म्हणतात की, ही कठीण वेळ आहे

इंधनाच्या किमतींबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, सध्याचा काळ कठीण आहे. जागतिक स्तरावर तेलाच्या किमती अनियंत्रित झाल्या आहेत. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सतत चढ-उताराचे वातावरण आहे. सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती खाली आल्या आहेत. आम्ही निर्यातीवर बंधने आणू इच्छित नाही, तर देशांतर्गत इंधनाची उपलब्धता वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. याचा सातत्याने आढावा घेतला जात आहे, असेही निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, यापूर्वी केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि जेट इंधनाच्या निर्यातीवरही कर लागू करण्याची घोषणा केली होती. याअंतर्गत पेट्रोल आणि एटीएफच्या निर्यातीवर प्रतिलिटर ०६ रुपये आणि डिझेलच्या निर्यातीवर १३ रुपये प्रतिलिटर कर लावण्यात आला. कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने घसरण होत असताना सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करावी, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा असल्याचे सांगितले जात आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :निर्मला सीतारामनइंधन दरवाढपेट्रोलडिझेल