Union Budget 2026: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प 2026-27 सादर केला. याद्वारे आगामी आर्थिक वर्षात सरकार ₹53.5 लाख कोटी (₹583.5 अब्ज डॉलर्स) इतका खर्च करणार आहे. विशेष म्हणजे, हा आकडा जगातील 165 देशांच्या एकूण GDP पेक्षाही अधिक आहे. मागील वर्षीचे बजेट ₹50 लाख कोटींपेक्षा कमी होते; त्यामुळे हा टप्पा पहिल्यांदाच ओलांडला गेला आहे.
भारत ‘ग्लोबल इकॉनॉमी’तील नवा शक्तिकेंद्र
भारत जागतिक अर्थव्यवस्थेत वेगाने पुढे जात असल्याचे चित्र या अर्थसंकल्पातून स्पष्ट होते. देशाचा वार्षिक खर्च अनेक मध्यम आकाराच्या अर्थव्यवस्थांच्या GDP पेक्षा जास्त असल्याने भारताचा आर्थिक विस्तार आणि सरकारी गुंतवणुकीची क्षमता अधोरेखित होते.
मागील काही वर्षातील देशाचे वार्षिक बजेट
2022: ₹39.45 लाख कोटी
2023: ₹45.00 लाख कोटी
2025: ₹48.21 लाख कोटी
2026 (RE): ₹50 लाख कोटींपेक्षा कमी
2027 (BE): ₹53.5 लाख कोटी
पहिल्यांदाच देशाचे वार्षिक बजेट ₹50 लाख कोटींच्या पुढे गेले आहे.
13 पूर्ण बजेट्स, खर्चात तिपटी वाढ...
मोदी सरकारच्या कार्यकाळातील हा 13वा पूर्ण अर्थसंकल्प आहे....
2014-15 (पहिले पूर्ण बजेट): ₹17.95 लाख कोटी
2026-27 : ₹53.50 लाख कोटी
याचा अर्थ, 13 वर्षांत सरकारी खर्चात जवळपास 3 पट (सुमारे 200%) वाढ झाली आहे. आगामी वर्षांतही या खर्चात वाढ होण्याचा अंदाज आहे.

