Gautam Adani News: 'मी जेव्हा स्वतःच्या आयुष्याची सुरूवात केली, तेव्हा माझ्याकडे कुठलाही रोडमॅप, साधनं आणि लोकांशी ओळखी नव्हत्या. माझ्याजवळ फक्त स्वप्नं होती. काही चांगल्या गोष्टी करण्याचे स्वप्न! माझे पालकांना आवाहन आहे की, आपल्या मुलाच्या भविष्याला आकार देणं म्हणजे पालकत्व नाहीये, तर त्यांना देशाचे भविष्य घडवण्यासाठी प्रेरित करणे खऱ्या अर्थाने पालकत्व आहे", असे अदाणी उद्योग समूहाचे चेअरमन गौतम अदानी गौतम म्हणाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अदानी इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांना गौतम अदानी यांनी मार्गदर्शन केले.
उद्योगपती गौतम अदानी म्हणाले, "या ठिकाणी असलेल्या पालकांना माझा सल्ला आहे की, तुमच्या मुलांना केवळ तुमची संपत्ती मिळणार नाही, तर संपत्तीपेक्षा जास्त तुमची मूल्ये मिळाली आहेत. त्यांच्यामध्ये लवचिकता, सहानुभूती आणि दुसऱ्यांची सेवा करण्याचे मूल्ये रुजवा."
"तुमच्या मुलांना नव्या गोष्टींसाठी, नवीन शोध लावण्यासाठी आणि स्वप्न पाहण्यासाठी प्रेरित करा. त्याचबरोबर ते कोणत्या भूमितून आले आहेत, हे ते विसरून नये म्हणून त्यांना त्यांच्या मूळांचीही आठवण करून द्या. त्यांना शिकवा की, यश हे फक्त वैयक्तिक नसतं, तर ते इतरांसाठी चांगलं घडवण्यासाठी असतं. आयुष्य त्यांनाही कुठेही नेईल. त्यांचं भविष्य ते भारतात घडवतील किंवा भारताबाहेर, पण त्यांनी भारतीयत्वाची भावना काय मनात जोपासावी, अशी शिकवण त्यांना द्या", असे गौतम अदानी यावेळी म्हणाले.
ग्लोबल सिटीजन होण्याची मुलांना मूभा द्या -गौतम अदानी
गौतम अदानी पुढे बोलताना म्हणाले की, "तुमच्या मुलांना जगाचे नागरिक होण्याची मूभा द्या, पण त्यांना हेही शिकवा की, ज्याला आपण मातृभूमी म्हणतो, त्या देशाबद्दल त्यांचं ह्रदयात कायम धडधडत राहावं. फक्त मुलांच्या भविष्याला आकार देणं म्हणजे पालकत्व नाहीये, तर भारताच्या भविष्याला आकार देण्यासाठी त्यांना प्रेरित करणं, हे खरं पालकत्व आहे", असे आवाहन गौतम अदानी यांनी विद्यार्थ्यांच्या आईवडिलांना केलं.