Join us

TATA 50 प्रमुख शहरांमध्ये 540 चार्जिंग स्टेशन्स उभारणार; या दोन कंपन्यांसोबत झाला करार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 17:12 IST

टाटा मोटर्सचे पाऊल देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

TATA Motors : देशातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी TATA Motors ने आपल्या इलेक्ट्रिक वाहनांचे (EVs) चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठी डेल्टा इलेक्ट्रॉनिक्स इंडिया आणि थंडरप्लस सोल्युशन्स, या दोन आघाडीच्या कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे. भारतात इलेक्ट्रिक वाहनांना अधिक सोयीस्कर आणि सुलभ बनवणे, हा या मागचा मुख्य उद्देश आहे.

गेल्या काही काळापासून टाटा मोटर्स इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. कंपनीच्या या भागीदारीअंतर्गत देशभरात 540 फास्ट चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत. यामुळे EV मालकांना चार्जिंगसाठी अधिक पर्याय मिळू शकतील आणि कोणत्याही त्रासाशिवाय लांब पल्ल्याचा प्रवास करू शकतील.

50 हून अधिक शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन बांधले जातीलटाटा मोटर्स 50 हून अधिक शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन्स उभारणार आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरू, पुणे आणि कोची सारख्या शहरांचा समावेश आहे. टाटा मोटर्सने आपल्या निवेदनात म्हटले की, ज्या मार्गांचा अधिक वापर केला जातो, त्या मार्गांवर चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चरचा विस्तार केला जाईल. यामुळे ग्राहकांना अधिक सुविधा मिळतील आणि EV वाहनांसाठी अधिक प्रोत्साहन मिळेल.

असा फायदा मिळेलटाटा मोटर्सचे हे पाऊल देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. तसेच, चार्जिंग सुविधा सहज उपलब्ध झाल्यास अधिकाधिक लोक इलेक्ट्रिक वाहने विकत घेतील. यामुळे प्रदूषण तर कमी होईलच, पण देशाची ऊर्जा सुरक्षाही वाढेल. याव्यतिरिक्त, टाटा मोटर्सने हे देखील स्पष्ट केले आहे की, ते आगामी वर्षांत आणखी नवीन ईव्ही मॉडेल्स लाँच करण्यासाठी आपल्या ईव्ही पोर्टफोलिओचा विस्तार करणार आहेत.

 

 

टॅग्स :टाटाइलेक्ट्रिक कार / स्कूटरइलेक्ट्रिक कारवाहनव्यवसाय