Stock Market : मंगळवारी बाजार सावरत असल्याचे संकेत मिळत असतानाच, बुधवारी भारतीय शेअर बाजारालायुद्धाच्या झळा आणि रुपयाच्या घसरणीचा मोठा तडाखा बसला. सेन्सेक्समध्ये १३४२ अंकांची भीषण पडझड झाली, तर निफ्टीने २४,००० चा महत्त्वाचा स्तर ओलांडून खाली उडी घेतली. या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये एका दिवसात स्वाहा झाले आहेत.
बाजाराची आजची स्थितीसेंसेक्स ७८,२३८ वर उघडलेला सेन्सेक्स दिवसअखेर १.७२% घसरून ७६,८६३ वर बंद झाला.निफ्टी ५०: २४,२३१ वर ओपनिंग झाल्यानंतर निफ्टी १.६३% घसरून २३,८६६ या स्तरावर स्थिरावला.
पडझडीची ३ प्रमुख कारणे
- नफेखोरी : गुंतवणूकदारांनी एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक आणि बजाज फायनान्स यांसारख्या दिग्गज बँकिंग आणि वित्तीय कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री करून नफा वसूल केला.
- युद्धाचे सावट: इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता वाढली असून त्याचा थेट दबाव भारतीय इक्विटीवर दिसत आहे.
- रुपयाची ऐतिहासिक घसरण: डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया २४ पैशांनी कमकुवत होऊन ९२.०४ च्या पातळीवर बंद झाला. रुपया घसरल्याने विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून पैसा काढण्यास सुरुवात केली आहे, कारण डॉलरमध्ये रूपांतरित करताना त्यांचा परतावा कमी होतो.
सेक्टोरल इंडेक्स: कोणाला फटका, कोणाला फायदा?
| तेजीत असलेले सेक्टर्स | वाढ (%) | घसरलेले सेक्टर्स | घसरण (%) |
| निफ्टी फार्मा | +०.४१% | निफ्टी ऑटो | -३.१५% |
| निफ्टी एनर्जी | +०.२८% | निफ्टी प्रायव्हेट बँक | -२.४१% |
| निफ्टी ऑईल & गॅस | +०.१८% | निफ्टी फायनान्शिअल | -२.३२% |
(बँकिंग, ऑटो आणि रिअल्टी क्षेत्रात मोठी विक्री पाहायला मिळाली)
टॉप गेनर्स आणि लूजर्सतेजीत : जिओ फायनान्शिअल (+१.१५%), डॉ. रेड्डीज (+०.८३%), कोल इंडिया (+०.७३%), सन फार्मा (+०.७३%).घसरण : बजाज फायनान्स (-४.९२%), ॲक्सिस बँक (-४.४९%), महिंद्रा अँड महिंद्रा (-३.८२%), आयशर मोटर्स (-३.६६%).
वाचा - इराण युद्धामुळे भारतीय उद्योगधंदे प्रभावित; सरकारच्या आदेशानंतर अदानी टोटल गॅसचा मोठा निर्णय
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Indian stock market crashes amid war fears and rupee fall. Sensex plunges 1342 points, Nifty below 24000. Banking, auto sectors hit hard due to profit-booking, geopolitical tensions, and weakening rupee, causing investor losses.
Web Summary : युद्ध के डर और रुपये में गिरावट के बीच भारतीय शेयर बाजार में गिरावट। सेंसेक्स 1342 अंक लुढ़का, निफ्टी 24000 से नीचे। मुनाफावसूली, भू-राजनीतिक तनाव और कमजोर रुपये के कारण बैंकिंग, ऑटो क्षेत्र बुरी तरह प्रभावित, निवेशकों को नुकसान।