Join us
Daily Top 2Weekly Top 5

Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 14:06 IST

Reliance Industries Share Price: भारतीय शेअर बाजारातील आजच्या कामकाजादरम्यान, देशातील सर्वाधिक मार्केट कॅपिटलायझेशन असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. पाहा काय आहे यामागचं कारण?

Reliance Industries Share Price: भारतीय शेअर बाजारातील आजच्या कामकाजादरम्यान, देशातील सर्वाधिक मार्केट कॅपिटलायझेशन असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. बीएसईवर (BSE) कंपनीचे शेअर ४.१३% ने घसरून १,२९५ च्या पातळीवर आलं. या घसरणीमुळे कंपनीचे मार्केट कॅप १८ लाख कोटी रुपयांवरून कमी होऊन १७.६५ लाख कोटी रुपयांवर आलं. रिलायन्सच्या शेअरमधील या पडझडीमागे 'जिओ-पॉलिटिकल' तणाव हे सर्वात मोठं कारण मानलं जात आहे.

रिलायन्सच्या शेअरमध्ये घसरण होण्याची मुख्य कारणं

अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धाची शक्यता निर्माण झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. जगातील मोठा तेल व्यापार 'होर्मुजच्या सामुद्रधुनी'मार्गे (Strait of Hormuz) होतो, जिथे सध्या तणाव वाढल्यानं तेलाच्या टंचाईची भीती व्यक्त होत आहे. रिलायन्स एक मोठं रिफायनिंग हब चालवतं, त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार आणि पुरवठ्यातील अडथळ्यांचा थेट परिणाम कंपनीच्या नफ्यावर होतो. गेल्या दोन आठवड्यांत कंपनीचा शेअर ८% पेक्षा जास्त घसरलाय.

RBI च्या कडक पावलांनंतर रुपयाची ऐतिहासिक झेप; १२ वर्षांतील सर्वात मोठी तेजीतज्ज्ञांच्या मते, सरकारने डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएलच्या निर्यातीवर लावलेल्या करामुळे रिलायन्सच्या अडचणी वाढल्या आहेत. सरकारने डिझेलवर २१.५० रुपये प्रति लिटर आणि ATF वर २९.५० रुपये प्रति लिटर निर्यात शुल्क पुन्हा लागू केलंय. 'जेफरीज'च्या अहवालानुसार, या निर्णयामुळे रिलायन्ससारख्या रिफायनिंग कंपन्यांसाठी डिझेल आणि ATF चा स्प्रेड प्रति बॅरल २० डॉलर्सपर्यंत मर्यादित होऊ शकतो. रिफायनिंग मार्जिनवर दबाव आल्याने भविष्यातील उत्पन्न घटण्याच्या भीतीने गुंतवणूकदार शेअरची विक्री करत आहेत.

SEZ रिफायनरीवरील कराबाबतची स्थिती

पीटीआयच्या वृत्तानुसार, एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं आहे की, पुन्हा लागू करण्यात आलेला 'विंडफॉल टॅक्स' रिलायन्सच्या स्पेशल इकॉनॉमिक झोन रिफायनरीवर लागू होणार नाही. 'सिटी रिसर्च'च्या अहवालानुसार, रिलायन्सच्या एकूण डिझेल उत्पादनापैकी ७५% आणि जेट फ्युएल उत्पादनापैकी ३५% हिस्सा त्यांच्या सेझ युनिटमधून येतो. जर हा भाग कराच्या कक्षेत येत नसेल, तर कंपनीवर येणारी टॅक्स लायाबिलिटी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : Reliance Shares Plunge: Investors Lose ₹35,000 Crore; Reasons Explained

Web Summary : Reliance Industries shares fell sharply due to geopolitical tensions and new export taxes on diesel and aviation fuel. This caused a significant drop in market capitalization, impacting investors. SEZ refinery tax status offers some relief.
टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकपैसारिलायन्सखनिज तेल