Join us

Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 13:57 IST

Mukesh Ambani On Operation Sindoor: पाकिस्ताननं २२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला केला होता, ज्याला भारत आता ऑपरेशन सिंदूर अंतर्गत प्रत्युत्तर देत आहे. यावर मुकेश अंबानी यांनी वक्तव्य केलंय.

Mukesh Ambani On Operation Sindoor: पाकिस्ताननं २२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला केला होता, ज्याला भारत आता ऑपरेशन सिंदूर अंतर्गत प्रत्युत्तर देत आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं सर्वप्रथम पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले, त्यानंतर आताही ऑपरेशन सिंदूर सुरू आहे. दरम्यान, देशातील दिग्गज उद्योगपती आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी यावर मोठं वक्तव्य केलंय. पाहूया काय म्हणालेत अंबानी.

मुकेश अंबानी यांनी आपल्या वक्तव्यात भारतीय जवानांचं कौतुक केलं. "ऑपरेशन सिंदूरसाठी आम्हाला आमच्या भारतीय सशस्त्र दलांवर अभिमान आहे. भारत सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्धच्या आपल्या उद्देशात एकजूट, दृढनिश्चयी आहे," असंही त्यांनी नमूद केलं.

मोदींबाबत काय म्हणाले अंबानी?

"पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्करानं सीमेपलिकडून होणाऱ्या प्रत्येक कुरापतींना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भारत दहशतवादासमोर कधीही शांत बसणार नाही. आम्ही आपली जमीन, आपले नागरिक आणि देशाचं संरक्षण करणाऱ्या जवानांवर एकही हल्ला सहन करू शकत नाही. आपली शांतता भंग करणाऱ्याच्या प्रत्येक प्रयत्नांना कठोर उत्तर दिलं जाईल, हे गेल्या काही महिन्यांत सिद्ध झालंय," असंही अंबानी म्हणाले.

रिलायन्स मदतीसाठी तयार

रिलायन्स कुटुंब देशातील एकता, अखंडतेचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक शक्य ती मदत करण्यासाठी तयार आहे. यआम्ही एकत्र उभे राहू, आम्ही लढू आणि जिंकू, जय हिंद, असं अंबानी म्हणाले.

टॅग्स :ऑपरेशन सिंदूरनरेंद्र मोदीमुकेश अंबानीरिलायन्स