Join us

पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 12:52 IST

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा १९वा हप्ता फेब्रुवारी २०२५ मध्ये जारी करण्यात आला होता. आता शेतकरी २०व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

PM Kisan Yojana : देशातील कोट्यवधी शेतकरी सध्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या बिहार दौऱ्यादरम्यान २४ फेब्रुवारी २०२५ रोजी या योजनेचा १९ वा हप्ता जारी केला होता. अल्पभूधारक आणि गरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून केंद्र सरकारने ही योजना आणली आहे. यात पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपयांची आर्थिक मदत देते. हे ६००० रुपये शेतकऱ्यांना दर ४ महिन्यांनी २००० रुपयांच्या ३ हप्त्यांच्या स्वरूपात दिले जाते. १९ वा हप्ता मिळाल्यानंतर, आता देशभरातील शेतकरी २० व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

शेतकऱ्यांना OTP आधारित eKYC करणे अनिवार्यशेतकऱ्यांच्या बँक खात्यात २०व्या हप्त्याचे पैसे नेमके कधी येतील याची नेमकी तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. २० वा हप्ता जारी होण्याच्या काही दिवस आधी सरकार स्वतः तारीख जाहीर करेल. या सरकारी योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना एप्रिल-जुलै, ऑगस्ट-नोव्हेंबर आणि डिसेंबर-मार्च या कालावधीत वर्षातून ३ वेळा पैसे मिळतात. योजनेअंतर्गत मिळणारे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी, नोंदणीकृत शेतकऱ्यांना ओटीपी आधारित ईकेवायसी करणे अनिवार्य आहे.

पीएम किसान यादीत तुमचे नाव कसे तपासायचे?

  • पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या - https://pmkisan.gov.in/.
  • आता 'Beneficiary List' लिहिलेल्या मोठ्या बॉक्सवर क्लिक करा.
  • आता तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा आणि गेट रिपोर्ट वर क्लिक करा.
  • सर्व लाभार्थ्यांची संपूर्ण यादी तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

वाचा - 'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट

फेब्रुवारी २०१९ मध्ये योजनेची सुरुवातपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने फेब्रुवारी २०१९ मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे आहे. जेणेकरून त्यांचे खर्च कमी करता येतील आणि त्यांचे उत्पन्न वाढू शकेल.

टॅग्स :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनानरेंद्र मोदीकृषी योजनाशेती क्षेत्र