Join us
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजासाठी गुड न्यूज! 'पीएम किसान'चा २२ वा हप्ता 'या' दिवशी होणार जमा; तुमचे ई-केवायसी पूर्ण आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 10:57 IST

PM Kisan Yojana : पंतप्रधान किसान योजनेच्या २२ व्या हप्त्यासाठी लाखो शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. सरकारने अधिकृतपणे घोषणा केली आहे की हा हप्ता १३ मार्च रोजी जारी केला जाईल.

PM Kisan Yojana : देशातील कोट्यवधी शेतकरी ज्या क्षणाची चातकासारखी वाट पाहत होते, तो क्षण अखेर जवळ आला आहे. केंद्र सरकारने 'पीएम किसान सन्मान निधी' योजनेच्या २२ व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर केली असून, येत्या १३ मार्च रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात २-२ हजार रुपये जमा होणार आहेत.

सरकारकडून अधिकृत शिक्कामोर्तबगेल्या अनेक दिवसांपासून २२ व्या हप्त्याबाबत विविध चर्चा सुरू होत्या. मात्र, आता सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वरील आपल्या अधिकृत हँडलवरून ही माहिती दिली आहे. यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ मार्च रोजी आसाम दौऱ्यावर असताना रिमोटचे बटण दाबून देशातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम वर्ग करतील. होळीच्या पार्श्वभूमीवर सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.

'या' चुकांमुळे तुमचे २ हजार रुपये अडकू शकतात!तारीख जाहीर झाली असली, तरी काही शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार नाहीत. जर खालील तांत्रिक गोष्टी पूर्ण नसतील, तर तुमचा हप्ता रोखला जाऊ शकतो.

  1. ई-केवायसी : ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांचा हप्ता अडकण्याची दाट शक्यता आहे.
  2. फॉर्मर आयडी : आता ई-केवायसीसोबतच नवीन नियमांनुसार 'फार्मर आयडी' तयार करणेही बंधनकारक झाले आहे.
  3. बँक खात्याची माहिती: आधार कार्डाशी बँक खाते लिंक नसणे किंवा फॉर्म भरताना खाते क्रमांक आणि IFSC कोडमध्ये चूक झाली असल्यास पैसे जमा होणार नाहीत.
  4. भूमी पडताळणी : जमिनीच्या नोंदींचे पडताळणी काम पूर्ण नसेल, तर अशा शेतकऱ्यांनाही या हप्त्यापासून मुकावे लागू शकते. 

वाचा - पोर्टफोलिओला मिळणार सोन्याचे 'सुरक्षा कवच'! सेबीच्या ऐतिहासिक निर्णयामुळे म्युच्युअल फंडात मोठा बदल

English
हिंदी सारांश
Web Title : Good news for farmers! PM Kisan 22nd installment date announced.

Web Summary : The 22nd installment of PM Kisan Samman Nidhi will be deposited on March 13th. Farmers must complete e-KYC, link bank accounts to Aadhaar, verify land records, and ensure their Farmer ID is created to receive the funds.
टॅग्स :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाकृषी योजनाशेती क्षेत्रशेतकरी