PM-Kisan Samman Nidhi Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २१व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने पीएम किसान सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता १९ नोव्हेंबर २०२५ रोजी जारी केला जाईल, अशी अधिकृत घोषणा केली आहे. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट २,००० रुपये जमा केले जातील.
या योजनेअंतर्गत २४ फेब्रुवारी २०१९ पासून आतापर्यंत देशभरातील ११ कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांना २० हप्त्यांद्वारे एकूण ३.७० लाख कोटींहून अधिक रक्कम मिळाली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाला वर्षाला ६,००० रुपयांची आर्थिक मदत मिळते.
कोणाचे पैसे अडकणार? e-KYC न करणाऱ्यांना फटका१९ नोव्हेंबर रोजी २१ वा हप्ता जारी होणार असला तरी, काही विशिष्ट गटातील शेतकऱ्यांना ही रक्कम मिळण्यास विलंब किंवा अडचण येऊ शकते.
- ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपले e-KYC (डिजिटल ओळख सत्यापन) पूर्ण केलेले नाही, त्यांचे पैसे अडकू शकतात.
- तुमचे आधार कार्ड आणि बँक खाते एकमेकांशी लिंक नसतील, तर तुमचा हप्ता थांबू शकतो.
- पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडमधील काही शेतकऱ्यांना १९ नोव्हेंबरला २,००० रुपये मिळणार नाहीत, कारण या राज्यांमध्ये त्यांचा २१ वा हप्ता आधीच जारी करण्यात आला आहे.
ज्या शेतकऱ्यांनी अद्याप e-KYC केली नसेल, त्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करावी.तुम्ही खालील तीन प्रकारे तुमचे e-KYC पूर्ण करू शकता.
- ओटीपी आधारित e-KYC: तुमच्या बँक किंवा आधार क्रमांकावर ओटीपी येईल, तो भरून सत्यापन पूर्ण करणे.
- बायोमेट्रिक e-KYC: फिंगरप्रिंट स्कॅनिंगसारख्या प्रक्रियेद्वारे ओळख निश्चित करणे.
- चेहऱ्यावर आधारित e-KYC: व्हिडिओ कॉलिंग किंवा कॅमेऱ्याद्वारे तुमचा चेहरा सत्यापित करणे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता
पीएम-किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी कुटुंबांनी आपल्या कृषी-जमिनीचा तपशील सरकारी पोर्टलवर नोंदवणे अनिवार्य आहे. याशिवाय, थेट बँक खात्यात पैसे जमा होण्यासाठी त्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक केलेले असणे आवश्यक आहे.
तुमच्या हप्त्याची स्थिती कशी तपासावी?
- वेबसाईट: पीएम-किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- लाभार्थी स्थिती: तेथे ‘लाभार्थी स्थिती’ या विभागात जा.
- माहिती भरा: आपला आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक भरा.
- तपासा: ‘डेटा प्राप्त करा’ बटनावर क्लिक करा.
- यानंतर तुम्हाला तुमचे नाव, देयकाची स्थिती आणि हप्त्याचा स्टेटस दिसेल.
वाचा - 'या' ३ प्रकारच्या लोकांनी म्युच्युअल फंड SIP पासून १० हात दूर राहावे, अन्यथा होईल नुकसान
याद्वारे, तुमचा २१ वा हप्ता जारी झाला की नाही, हे तुम्ही तपासू शकता आणि काही समस्या असल्यास वेळेत तक्रार नोंदवू शकता.
Web Summary : PM-Kisan's 21st installment releases November 19th, crediting ₹2,000. Over 11 crore farmers have benefited so far. Those without e-KYC, Aadhaar-bank linking, or those in specific states already paid, may face delays. Complete e-KYC immediately to ensure payment.
Web Summary : पीएम-किसान की 21वीं किस्त 19 नवंबर को जारी, ₹2,000 जमा होंगे। 11 करोड़ से अधिक किसानों को लाभ मिला। ई-केवाईसी, आधार-बैंक लिंकिंग के बिना या विशिष्ट राज्यों में पहले ही भुगतान किए गए किसानों को देरी हो सकती है। भुगतान सुनिश्चित करने के लिए तुरंत ई-केवाईसी पूरा करें।