Join us  

आंध्र प्रदेशात सर्वात महाग, तर...; जाणून घ्या इतर राज्यातील पेट्रोल-डिझेलचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 2:38 PM

Petrol Price in states: सरकारने गेल्या आठवड्यात पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले, यामुळे सामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Petrol Price in states: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL), या तिन्ही सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांनी गेल्या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 2 रुपयांनी कमी केल्या. जवळपास दोन वर्षांपासून वाहनांच्या इंधनाच्या दरात कोणतीही सुधारणा करण्यात आली नव्हती. या कपातीमुळे लोकांना काहीसा दिलासा मिळाला, पण उच्च मूल्यवर्धित करामुळे अनेक राज्यांमध्ये वाहनांचे इंधन अजूनही 100 रुपयांपेक्षा जास्त आहे.

सध्या आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि केरळमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात जास्त आहेत. तर, अंदमान-निकोबार बेटे, दिल्ली आणि ईशान्येसारख्या लहान राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये इंधनाचे दर सर्वात कमी आहेत. स्थानिक विक्री कर किंवा मूल्यवर्धित करातील फरकांमुळे वाहनांच्या इंधनाच्या किमती वेगवेगळ्या राज्यांमध्ये बदलतात.

सर्वाधिक पेट्रोल दर कोणत्या राज्यात?वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या YSRCP सरकारची सत्ता असलेल्या आंध्र प्रदेशमध्ये पेट्रोल 109.87 रुपये प्रति लिटर आहे. तर, केरळमध्ये डाव्या लोकशाही आघाडीची (LDF) सत्ता आहे. तिथे एक लिटर पेट्रोल 107.54 रुपयांना विकले जाते. तर, काँग्रेसशासित तेलंगणात पेट्रोलचा दर प्रतिलिट दर 107.39 रुपये आहे. भाजप शासित राज्येही या यादीत मागे नाहीत. मध्य प्रदेशात पेट्रोलचे दर प्रति लिटर 106.45 रुपये, बिहारमध्ये 105.16 रुपये, राजस्थानमध्ये 104.86 रुपये तर महाराष्ट्रात 104.19 रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय, पश्चिम बंगाल प्रति लिटर 103.93 रुपये, ओडिशा 101.04 रुपये प्रति लिटर, तामिळनाडू 100.73 रुपये आणि छत्तीसगड 100.37 रुपये प्रति लिटर आहे. 

सर्वात कमी पेट्रोल कुठे?अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये पेट्रोल सर्वात स्वस्त 82 रुपये प्रति लिटर आहे. यानंतर सिल्वासा आणि दमणमध्ये 92.38-92.49 रुपये प्रति लिटर आहे. इतर छोट्या राज्यांमध्येही पेट्रोल स्वस्त आहे. यामध्ये दिल्ली (रु. 94.76 प्रति लीटर), गोवा (रु. 95.19), मिझोरम (रु. 93.68) आणि असाम (रु. 96.12) आहे.

सर्वाधिक डिझेल दर कोणत्या राज्यात?डिझेलच्या किमतींबद्दल बोलायचे झाले तर आंध्र प्रदेशमध्ये 97.6 रुपये प्रति लिटर, केरळ 96.41 रुपये, तेलाागणा 95.63 रुपये, झारखंड 93.31 रुपये आहे. तर, भाजपशासित महाराष्ट्र, छत्तीसगड आणि बिहारमध्ये डिझेलचे दर प्रतिलिटर 92 ते 93 रुपये आहेत. ओडिशा आणि झारखंडमध्येही डिझेलची किंमत सारखीच आहे.

सर्वात स्वस्त डिझेलअंदमान आणि निकोबार बेटांमध्ये डिझेल 78 रुपये प्रति लिटर, सर्वात स्वस्त आहे. महानगरांमध्ये दिल्लीतील व्हॅट सर्वात कमी आहे. दिल्लीत डिझेलची किंमत 87.66 रुपये प्रति लिटर आहे, तर गोव्यात त्याची किंमत 87.76 रुपये प्रति लिटर आहे. 

टॅग्स :पेट्रोलडिझेलव्यवसायभारतआंध्र प्रदेशमहाराष्ट्रकेंद्र सरकारभाजपा