देशात अनेक ठिकाणी पेट्रोलच्या दरानं शंभरी गाठली आहे. तर दुसरीकडे डिझेलचे दरही सातत्यानं वाढत आहे. शनिवारी सलग १२ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली. यामुळे जनतेच्या खिशावर मोठा ताण पडत आहे. तर दुसरीकडे इंधन दरवाढीवरून विरोधकांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. याचदरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या मुद्द्यावर भाष्य केलं. हा एक गंभीर आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी चर्चा करून ग्राहकांना योग्य दरात इंधन उपलब्ध करून दिलं पाहिजे, असं त्या म्हणाल्या. शनिवारी दिल्लीत पेट्रोलच्या दरात ३९ पैशांती वाढ झाली. त्यानंत दिल्लीतील पेट्रोलचे दर ९०.५८ रूपयांवर पोहोचले आहेत. तर डिझेलचेही दर ३७ पैशांनी वाढून ८०.९७ रूपयांवर पोहोचले आहेत. सध्या देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरानं उच्चांक गाठला आहे. देशातील अनेक शहरांमध्ये पट्रोलच्या दरानं शंभरी गाठली आहे. इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे काँग्रेसनंही कंद्र सरकारविरोधात आंदोलन केलं.
Petrol Price Hike: इंधनाचे वाढते दर गंभीर मुद्दा; केंद्र आणि राज्य सरकारांनी चर्चा करावी - निर्मला सीतारामन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 16:15 IST
Petrol diesel Price Hike : मोदी सत्तेत आल्यानंतर आतापर्यंत पेट्रोलच्या दरात २६ टक्के, तर डिझेलच्या दरात ४२ टक्क्यांची वाढ
Petrol Price Hike: इंधनाचे वाढते दर गंभीर मुद्दा; केंद्र आणि राज्य सरकारांनी चर्चा करावी - निर्मला सीतारामन
ठळक मुद्देसलग बाराव्या दिवशी झाली इंधन दरवाढमोदी सत्तेत आल्यानंतर आतापर्यंत पेट्रोलच्या दरात २६ टक्के तर डिझेलच्या दरात ४२ टक्क्यांची वाढ