Join us
Daily Top 2Weekly Top 5

LPG सिलेंडरच्या नियमांबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका! सरकारने दिले स्पष्टीकरण; काय आहे वस्तुस्थिती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 11:52 IST

Government Clarification on LPG Booking: LPG बुकिंगसंदर्भात एक नवीन नियम लागू करण्यात आला आहे. ज्या ग्राहकांकडे दोन सिलिंडरचे कनेक्शन आहे—ज्याला 'डबल-बॉटल' कनेक्शन म्हणूनही ओळखले जाते.

LPG Shortage: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया आणि काही माध्यमांमध्ये एलपीजी सिलेंडर बुकिंगच्या नियमांत मोठे बदल झाल्याच्या बातम्या फिरत आहेत. पश्चिम आशियातील तणावामुळे गॅस टंचाई निर्माण झाल्याचा दावा करत, वेगवेगळ्या जोडण्यांसाठी वेगवेगळी कालमर्यादा निश्चित केल्याचे सांगितले जात होते. मात्र, केंद्र सरकारने या सर्व बातम्या फेटाळून लावल्या असून, नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.

काय होती ती चुकीची माहिती?काही समाज माध्यमांवरील पोस्टमध्ये असा दावा केला होता की,

  1. PMUY (उज्ज्वला) ग्राहक : ४५ दिवसांचे अंतर.
  2. बिगर-PMUY (एकल सिलेंडर) : २५ दिवसांचे अंतर.
  3. बिगर-PMUY (दुहेरी सिलेंडर) : ३५ दिवसांचे अंतर.
  4. सरकारने स्पष्ट केले आहे की, अशा प्रकारचा कोणताही भेदभाव किंवा बदल करण्यात आलेला नाही.

सध्याचे अधिकृत नियम काय आहेत?

क्षेत्र बुकिंगमधील अनिवार्य अंतर टिप 
शहरी भाग २५ दिवस जोडणीचा प्रकार कोणताही असो
ग्रामीण भाग ४५ दिवस सर्व ग्राहकांसाठी समान नियम. 

देशात पुरेशा साठ्याचा पुनरुच्चारसरकारने नागरिकांना आश्वस्त केले आहे की, देशात एलपीजी सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. पश्चिम आशियातील परिस्थितीमुळे पुरवठा साखळीवर कोणताही परिणाम झालेला नाही. नागरिकांनी घाबरून जाऊन किंवा अनावश्यक बुकिंग करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. चुकीची माहिती प्रसारित करणे हा गुन्हा असल्याचेही सरकारने म्हटले आहे.

वाचा - LIC मधून निवृत्त, मग 'सोनालिका'चे सम्राट! भारतातील सर्वात वयस्कर अब्जाधीशाचा थक्क करणारा प्रवास

डिलिव्हरीसाठी तांत्रिक बाबी महत्त्वाच्यानियम बदलले नसले तरी, सुरक्षेच्या आणि पारदर्शकतेच्या दृष्टीने खालील दोन गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका:

  • OTP सक्तीचा : सिलेंडर डिलिव्हरीच्या वेळी तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर आलेला ओटीपी डिलिव्हरी बॉयला सांगणे आवश्यक आहे.
  • e-KYC पूर्ण करा : ज्या ग्राहकांचे केवायसी अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यांना भविष्यात बुकिंगमध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे ते त्वरित अपडेट करून घेणे हिताचे ठरेल.
English
हिंदी सारांश
Web Title : Use LPG Gas Wisely! Cylinder after 35 days, new rules.

Web Summary : Gas companies increased waiting periods. Refills now after 35 days, not 25. Stricter rules for double cylinder, Ujjwala, and rural connections. OTP and e-KYC are mandatory for delivery. Additional cylinders need justification.
टॅग्स :एलपीजी गॅस टंचाईइंधन टंचाईइंधन दरवाढअमेरिका-इस्रायल-इराण वॉरगॅस सिलेंडरभारत