Kitchen Appliance Stocks : एकावरचे संकट दुसऱ्यासाठी संधी असू शकते, याचे ताजे उदाहरण समोर आलं आहे. मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. ७ मार्च रोजी घरगुती सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ झाल्याने दिल्लीत दर ९१३ रुपयांवर पोहोचले आहेत. या महागाईपासून सुटका मिळवण्यासाठी ग्राहकांनी आता आपला मोर्चा इंडक्शन कुकटॉप, इलेक्ट्रिक स्टोव्ह आणि गॅस-मुक्त कुकिंग पर्यायांकडे वळवला आहे. ग्राहकांच्या या कल बदलण्याचा थेट फायदा शेअर बाजारातील किचन अप्लायन्सेस बनवणाऱ्या कंपन्यांना झाला असून त्यांचे शेअर्स सुसाट धावत आहेत.
ई-कॉमर्सवर मागणीचा 'विस्फोट'गेल्या २४ तासांत इंडक्शन स्टोव्हची मागणी 'क्विक कॉमर्स' प्लॅटफॉर्मवर १० पटीने, तर 'ई-कॉमर्स'वर २० पटीने वाढली आहे. गॅसचा तुटवडा आणि वाढते दर यामुळे ग्राहकांनी इलेक्ट्रिक पर्यायांना पसंती दिल्याने या क्षेत्रातील कंपन्यांचे नफे वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
'या' ५ कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी
| कंपनीचे नाव | आजची वाढ (%) | शेअरची किंमत (रु.) | तेजीचे मुख्य कारण |
| टीटीके प्रेस्टीज | १४.५५% | ५५५ | इंडक्शन कुकटॉप आणि प्रेशर कुकरमधील मक्तेदारी |
| स्टोव्ह क्राफ्ट | ७.६२% | ५२३ | 'Pigeon' ब्रँडच्या इंडक्शन सेल्समध्ये मोठी वाढ |
| बटरफ्लाय गांधीमती | ३.००% | ६२५ | टेबलटॉप स्टोव्ह आणि इंडक्शनमध्ये दक्षिण भारतात मजबूत पकड |
| बजाज इलेक्ट्रिकल्स | २.००% | ३८५ | घरगुती इलेक्ट्रिक कुकवेअर उत्पादनांना वाढती पसंती |
| हॅवेल्स इंडिया | २.००% | १,३८९ | प्रिमिअम इंडक्शन कुकटॉप्सच्या मागणीत झालेली वाढ |
शेअर्सची कामगिरी
- टीटीके प्रेस्टीज या शेअरने आज ५५५ रुपयांचा टप्पा गाठला. सलग दुसऱ्या दिवशी या शेअरमध्ये मोठी खरेदी पाहायला मिळाली.
- स्टोव्ह क्राफ्ट ४९१ रुपयांवर उघडलेला हा शेअर ५२३ रुपयांपर्यंत पोहोचला. इंडक्शन विक्रीतील अचानक आलेल्या उसळीमुळे गुंतवणूकदार उत्साहित आहेत.
- हॅवेल्स इंडियाने आज १,४०४ रुपयांचा उच्चांक गाठला. इलेक्ट्रिक किचन प्रोडक्ट्समधील वाढती मागणी गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवत आहे.
वाचा - MCX वर चांदी ३ लाखांच्या पार, तर सोन्यात नफेखोरीमुळे घसरण; तुमच्या शहरातील ताजे दर जाणून घ्या
तेजी कायम राहणार?तज्ज्ञांच्या मते, जर एलपीजी टंचाईची समस्या पुढील काही आठवडे कायम राहिली, तर इलेक्ट्रिक कुकिंगकडे होणारे हे स्थलांतर अधिक तीव्र होईल. यामुळे टीटीके प्रेस्टीज, स्टोव्ह क्राफ्ट आणि बटरफ्लाय गांधीमती सारख्या कंपन्यांच्या महसुलात मोठी वाढ होऊ शकते, ज्याचा फायदा त्यांच्या शेअर्सना दीर्घकाळ मिळेल.
Web Summary : LPG price hikes spur induction cooktop demand, benefiting kitchen appliance stocks. E-commerce sees a surge in induction stove orders. TTK Prestige, Stove Kraft, and others experience share price increases due to increased electric cooking adoption.
Web Summary : एलपीजी की कीमतों में वृद्धि से इंडक्शन कुकटॉप की मांग बढ़ी, जिससे किचन उपकरण शेयरों को लाभ हुआ। ई-कॉमर्स पर इंडक्शन स्टोव के ऑर्डर में उछाल आया। इलेक्ट्रिक कुकिंग को अपनाने से टीटीके प्रेस्टीज, स्टोव क्राफ्ट और अन्य के शेयर की कीमतों में वृद्धि हुई।