Join us

देशातून आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण लांबले, 15 जुलैपर्यंत विमानप्रवास बंदच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 17:53 IST

केंद्र सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने परिपत्रक जारी केलं असून देशात येणाऱ्या आणि देशातून बाहेर जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणाला 15 जुलैपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

नवी दिल्ली - देशातील लॉकडाऊनचा चौथा टप्पा आता संपत आला असून 31 जुलैनंतर काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. मात्र, देशातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आणखी काही काळासाठी हा लॉकडाउन वाढण्याची शक्यता दिसून येत आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 31 जुलैपर्यंत लॉकडाउन वाढल्याचे जाहीर केले आहे. मात्र, या लॉकडाउनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. आता, केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमानप्रवास 15 जुलैपर्यंत बंदच राहणार असल्याचे सांगितले आहे. 

कोरोनामुळे देशात अद्यापही लॉकडाउन असून विमान वाहतूकसेवा बंद ठेवण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या जुन्या आदेशानुसार 30 जुलैपर्यंत विमानसेवेला परवानगी नाकारण्यात आली होती. आता, या विमानसेवा बंदमध्ये आणखी वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक आणखी काही काळ बंदच राहणार आहे. 

केंद्र सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने परिपत्रक जारी केलं असून देशात येणाऱ्या आणि देशातून बाहेर जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणाला 15 जुलैपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. 30 मे रोजी सरकारने जारी केलेल्या आदेशाची यापुढेही अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार 15 जुलैपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवेला परवानगी नाकारण्यात आल्याचं या परिपत्रकात म्हटलं आहे. फक्त सरकारने परवानगी दिलेल्याच विमानांच्या मार्गांवरील सेवा सुरु राहिल. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, असेही या आदेशात म्हटले आहे.  

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

Unlock 2 ची तयारी सुरु; शाळा, कॉलेज सुरु होणार? मोदी लवकरच निर्णय घेणार

पाकिस्तानकडून युद्धाची तयारी? POK मध्ये हॉस्पिटलांचे 50 टक्के बेड केले आरक्षित

CoronaVirus: 40 वर्षांपूर्वीच भारताकडे कोरोनाचे रामबाण औषध? 'आयुष'ची चाचणीला मंजुरी

OMG पोकेमॉन 'खुळे'! आजोबा सायकलवर तब्बल 64 फोन लावून खेळत हिंडतात

मोदी सरकार मोठा निर्णय घेणार; नोकरदारांना ग्रॅच्युईटीमध्ये दिलासा देणार

चीनच नाही, अमेरिकाही विश्वासघातकी! एकेकाळी भारतावरच हवाई हल्ल्याचे आदेश दिले होते

सोन्याला 'ऐतिहासिक' झळाळी, तोळ्याचा दर 50 हजार पार; दोन वर्षांत होईल 'चमत्कार'

टॅग्स :एअर इंडियाकोरोना वायरस बातम्या