Infosys : भारतातील आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिसने आता ऑस्ट्रेलियातील आपला व्यवसाय आणखी मजबूत करण्यासाठी एक मोठा करार केला आहे. इन्फोसिसने ऑस्ट्रेलियन आयटी कंपनी 'व्हर्संट ग्रुप' मधील ७५% हिस्सा सुमारे १,३०० कोटी रुपयांना (२३३.२५ दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्स) विकत घेतला आहे. या करारामुळे, व्हर्संट ग्रुपचे ऑपरेशनल नियंत्रण आता इन्फोसिसकडे आले आहे.
करार महत्त्वाचा का आहे?
- संयुक्त उपक्रम: हा करार इन्फोसिस आणि व्हर्संटची मूळ कंपनी 'टेलस्ट्रा ग्रुप' यांच्यातील एक संयुक्त उपक्रम आहे. टेलस्ट्राकडे आता व्हर्संटमध्ये फक्त २५% हिस्सा राहिला आहे.
- एआय आणि क्लाउडवर लक्ष: इन्फोसिसच्या मते, या करारामुळे ते ऑस्ट्रेलियात एआय-आधारित क्लाउड आणि डिजिटल सोल्यूशन्सना प्रोत्साहन देऊ शकतील. इन्फोसिसचा 'टोपाझ' हा एआय प्लॅटफॉर्म व्हर्संटच्या क्लाउड सोल्यूशन्सना मदत करेल.
- सरकार आणि कॉर्पोरेट क्षेत्रात सेवा: व्हर्संट ग्रुप प्रामुख्याने ऑस्ट्रेलियातील सरकार, शिक्षण, वित्तीय संस्था आणि ऊर्जा क्षेत्राला क्लाउड सेवा पुरवते. इन्फोसिस आता या ग्राहकांना अधिक चांगल्या सेवा देऊ शकेल.
- कर्मचाऱ्यांची मोठी टीम: व्हर्संटकडे ऑस्ट्रेलियामध्ये ६५० अभियंते आणि सल्लागारांची एक मजबूत टीम आहे, जी इन्फोसिसला ऑस्ट्रेलियात आपला विस्तार वाढवण्यास मदत करेल.
इन्फोसिसच्या शेअर्सवर सकारात्मक परिणामया मोठ्या घोषणेनंतर, शेअर बाजारातही इन्फोसिसच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली. अमेरिकन शेअर बाजारात इन्फोसिसच्या शेअर्सची किंमत १.६% ने वाढली, तर भारतीय शेअर बाजारातही त्याचे शेअर्स थोडेसे वधारले. यामुळे गुंतवणूकदारांनाही दिलासा मिळाला आहे.
वाचा - २२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
इन्फोसिस गेल्या अनेक काळापासून व्हर्संटची मूळ कंपनी टेलस्ट्रासोबत काम करत आहे. या करारामुळे आता दोन्ही कंपन्यांचे संबंध अधिक दृढ झाले आहेत आणि इन्फोसिसला ऑस्ट्रेलियामध्ये आपली पकड अधिक मजबूत करण्यास मदत होईल.