Join us  

टॉप परफॉर्मरला मिळणार Mercedes Benz कार; देशातील 'या' मोठ्या कंपनीची कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 3:18 PM

IT Company Employee : कोणत्याही कर्मचाऱ्याच्या कंपनी सोडून गेल्यानंतर कंपन्यांच्या नवी भरती करणं २० टक्के महागात पडतं. कंपन्या कर्मचाऱ्यांना सोबत ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करताना दिसतात.

ठळक मुद्देकोणत्याही कर्मचाऱ्याच्या कंपनी सोडून गेल्यानंतर कंपन्यांच्या नवी भरती करणं २० टक्के महागात पडतं.कंपन्या कर्मचाऱ्यांना सोबत ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करताना दिसतात.

HCL Technologies Offering to its Employees : आपल्या जुन्या कर्मचाऱ्यांना सोबत ठेवण्यासाठी आयटी कंपन्या सातत्यानं काही ना काही नव्या युक्त्या लढवत असतात. याचं मुख्य कारण म्हणजे जुन्या कर्मचाऱ्याच्या जागी नव्या व्यक्तीची निवड करणं कंपन्यांना २० टक्के महागात पडतं. यासाठीच कंपन्या कॅश बेस्ड इन्सेटिव्ह्स (Cash Based Incentives) देऊन आणि अन्य प्रकारांचा अवलंब करून आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. आता HCL टेक्नॉलॉजीचं उदाहरण घ्यायचं झालं तर कंपनीनं टॉप परफॉर्मर्सना एक कार देण्याचा निर्णय घेतला आहे आणि ती कोणतीही साधीसुधी कार नसून मर्सिडीज बेन्झ कार आहे.

एचसीएलचे सीएचआरओ अप्पाराव व्ही.व्ही यांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रस्ताव सध्या कंपनीच्या संचालक मंडळापुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. कंपनीनं २०१३ मध्ये टॉप परफॉर्मर्सना ५० मर्सिडीज बेन्झ कार्स दिल्या होत्या. त्यानंतर ते बंद करण्यात आलं होतं. रिप्लेसमेंटमध्ये हायरिंग कॉस्ट १५ ते २० टक्के अधिक असते. यासाठीच आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांचं कौशल्य वाढवण्यास सक्रियरित्या भाग घेत आहोत, असंही त्यांनी नमूद केलं. 

एचसीएल टेक्नॉलॉजीसनं सुरू आर्थिक वर्षामध्ये २२ हजार फ्रेशर्सची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी ही संख्या १५,६०० होती. अप्पाराव व्ही. व्ही. यांच्या म्हणण्यानुसार एचसीएलकडे उत्तम रिटेंशन पॅकेज आहे, जे दरवर्षीच्या सीटीसी च्या ५० ते १०० टक्के आहे. लीडरशीप टीम्समधील कमीतकमी १० टक्के महत्त्वाच्या लोकांना याचा लाभ झाला असल्याचंही त्यांनी नमूद केलं. 

ऑफर नाकारणारेही अनेक"भारतीय आयटी क्षेत्रात जॉब नाकारणाऱ्या उमेदवारांसहदेखील डील केली जात आहे. सध्या काम नाकारणाऱ्यांची संख्या अधिक आहे कारण काम शोधणाऱ्यांसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत," असं अप्पाराव म्हणाले.

टॅग्स :माहिती तंत्रज्ञानमर्सिडीज बेन्झभारतकर्मचारी