Google CEO Sundar Pichai Salary: गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सुंदर पिचाई यांना पुढील तीन वर्षांत त्यांच्या कंपनीकडून मोठं 'वेतन' मिळणार आहे. 'फायनान्शिअल टाइम्स'च्या अहवालानुसार, अल्फाबेटच्या मालकीच्या गूगलनं सुंदर पिचाई यांचे पुढील तीन वर्षांसाठीचे संभाव्य एकूण मानधन (कम्पेन्सेशन) वाढवून ६९२ मिलियन डॉलर्स केलंय, जे भारतीय रुपयांत सुमारे ६,३०० कोटी रुपये होते. मात्र, हे वेतन मिळवण्यासाठी पिचाई यांना कंपनीनं दिलेली उद्दिष्टं पूर्ण करावी लागणार आहेत.
सुंदर पिचाई यांचं सॅलरी ब्रेकअप
अहवालानुसार, या वेतनवाढीमुळे सुंदर पिचाई हे जगातील सर्वाधिक वेतन घेणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी एक बनलेत. त्यांच्या वेतन पॅकेजचा मोठा हिस्सा, म्हणजेच १२६ मिलियन डॉलर्स मूल्याचे 'परफॉर्मन्स स्टॉक युनिट्स' (PSUs) दोन हप्त्यांमध्ये विभागले गेले आहेत. हे स्टॉक्स अल्फाबेटच्या भागधारकांना मिळणारा परतावा आणि S&P 100 इंडेक्सवर अवलंबून असतील. जर पिचाई यांनी त्यांची सर्व उद्दिष्टे पूर्ण केली, तर ही रक्कम २५२ मिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते. मात्र, जर निकष पूर्ण झाले नाहीत, तर ही रक्कम शून्य देखील होऊ शकते. याव्यतिरिक्त, त्यांच्या निश्चित स्टॉक आणि वेतनामध्ये दरमहा मिळणाऱ्या ८४ मिलियन डॉलर्सच्या 'रिस्ट्रिक्टेड स्टॉक्स'चा समावेश आहे. तसंच त्यांचा वार्षिक पगार २ मिलियन डॉलर्स असेल.
५ दिवसांत ३३०० अंकांनी आपटला Sensex; ₹१९ लाख कोटी स्वाहा, पुढे आणखी खराब होणार का स्थिती?
'ऑटोनॉमस व्हेंचर्सकडून विशेष इन्सेन्टिव्ह्स
गूगलनं पहिल्यांदाच पिचाई यांच्यासाठी ३५० दशलक्ष डॉलर्सच्या नवीन 'स्टॉक इन्सेंटिव्ह'ची घोषणा केली. हे इन्सेंटिव्ह कंपनीच्या ऑटोनॉमस प्रकल्पांच्या वाढीशी संबंधित आहेत. यामध्ये पिचाई यांना १३० मिलियन डॉलर्सचं 'Waymo' स्टॉक्स आणि ४५ मिलियन डॉलर्सचं 'Wing' शेअर्स दिले जातील.
सुंदर पिचाई यांच्या नेतृत्वात गूगलची प्रगती
सुंदर पिचाई यांच्या नेतृत्वाखाली गूगल सातत्यानं प्रगती करत आहे. २०१५ मध्ये जेव्हा ते गूगलचे सीईओ बनले, तेव्हापासून कंपनीचं बाजार भांडवल ७ पटीनं वाढलं आहे. हे भांडवल ५३५ अब्ज डॉलर्सवरून ३.६ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचलंय. ५३ वर्षीय सुंदर पिचाई यांचा जन्म भारतात झाला असून त्यांनी २००४ मध्ये गूगलमध्ये प्रवेश केला होता. गूगल क्रोमचा विकास आणि अँड्रॉइड ओएसचं नेतृत्व करण्यासाठी ते ओळखले जातात. आता त्यांच्या नेतृत्वाखाली गूगल एआय क्षेत्रात वेगानं पुढे जात आहे.
Web Summary : Google CEO Sundar Pichai's compensation package could reach $692 million over three years if he meets performance goals. The package includes stock incentives tied to Alphabet's performance and autonomous projects like Waymo and Wing, potentially making him one of the highest-paid executives globally. Google's market value has increased significantly under Pichai's leadership.
Web Summary : गूगल के सीईओ सुंदर पिचाई को अगले तीन वर्षों में $692 मिलियन तक का पैकेज मिल सकता है, यदि वे प्रदर्शन लक्ष्य पूरा करते हैं। इसमें अल्फाबेट के प्रदर्शन और वेमो और विंग जैसी स्वायत्त परियोजनाओं से जुड़े स्टॉक प्रोत्साहन शामिल हैं, जो उन्हें विश्व स्तर पर सबसे अधिक वेतन पाने वाले अधिकारियों में से एक बना सकते हैं। पिचाई के नेतृत्व में गूगल का बाजार मूल्य काफी बढ़ा है।