Join us

Pension and Salary Rules: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पेन्शन आणि सॅलरीमध्ये होणार बम्पर वाढ, मोदी सरकारनं घेतला निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 08:30 IST

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनुसार (ईपीएफओ), यावेळी कर्मचाऱ्यांच्या किमान पगारात वाढ करण्यासंदर्भातही चर्चा सुरू आहे. सरकार कर्मचाऱ्यांसाठी लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसंदर्भात केंद्र सरकारकडून मोठी योजना आखली जात आहे. यानंतर सर्वच कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये बम्पर वाढ होईल. कर्मचारीभविष्य निर्वाह निधी संघटनेनुसार (ईपीएफओ), यावेळी कर्मचाऱ्यांच्या किमान पगारात वाढ करण्यासंदर्भातही चर्चा सुरू आहे. सरकार कर्मचाऱ्यांसाठी लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

21,000 रुपये होईल सॅलरी -सध्या कर्मचाऱ्यांची किमान सॅलरी 15,000 रुपये एवढी आहे. ती वाढवून आता 21,000 रुपये करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. माध्यमांतील वृत्तांनुसार, कर्मचाऱ्यांची किमान सॅलरी वाढल्यानंतर, त्यांच्या पेन्शनमध्येही वाढ होईल.

2014 मध्येही वाढली होती किमान सॅलरी - यापूर्वी केंद्र सरकारने 2014 मध्येही मिनिमम अथवा किमान सॅलरीत वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आता पुन्हा, मोदी सरकार कर्मचाऱ्यांचे वेतन वाढविण्यासंदर्भात योजना आखत आहे. महत्वाचे म्हणजे, कर्मचाऱ्यांची सॅलरी वाढली, तर त्यांचे पेन्शन आणि पीएफचा वाटाही वाढेल.

किती होईल पीएफ कॉन्ट्रिब्यूशन -सध्या कर्मचाऱ्यांच्या किमान सॅलरीचे कॅलक्युलेशन 15,000 रुपयांवर केले जाते. यामुळे ईपीएस खात्यात जास्तीत जास्त 1250 रुपयेच जमा होतात. मात्र, सरकारने सॅलरी वाढवली, तर कॉन्ट्रिब्यूशनही वाढेल. सॅलरी वाढल्यानंतर, मासिक कॉन्ट्रिब्यूशन 1749 रुपये (21,000 रुपयांचे 8.33 टक्के) होईल.

कर्मचाऱ्यांना होणार अनेक फायदे- सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटनंतरही अधिक पेन्शनचा फायदा मिळेल. जर कुठल्याही कर्मचाऱ्याने 20 वर्षांपर्यंत काम केले, तर त्यांना ईपीएसच्या माध्यमाने मिळणारी मंथली पेन्शन 7286 रुपये होईल. याशिवाय सॅलरी वाढल्याने कर्मचाऱ्यांना इतरही अनेक प्रकारचे  फायदे होतील.

टॅग्स :नरेंद्र मोदीकर्मचारीभविष्य निर्वाह निधीनिवृत्ती वेतन