Israel-Iran Conflict : इस्रायल आणि इराणमधील वाढत्या संघर्षामुळे जागतिक पातळीवर चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही देशांमध्ये सतत होत असलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा थेट परिणाम जागतिक शेअर बाजारांवर दिसून येत आहे. आता सोन्याच्या किमतीचाही भडका उडाला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव १ लाखांच्या पुढे गेला आहे, तर देशांतर्गत बाजारातही सोन्याचे दर झपाट्याने वाढत आहेत.
MCX वर सोन्याचा भाव १ लाख पारइस्रायल आणि इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या भावाने पुन्हा एकदा १,००,००० चा टप्पा ओलांडला आहे. गेल्या एका आठवड्यात या किमतीत मोठा बदल दिसून आला. ६ जून २०२५ (शुक्रवार) रोजी, ५ ऑगस्ट रोजी एक्सपायर झालेल्या सोन्याची किंमत ९७,०३६ प्रति १० ग्रॅम होती. ती १३ जून रोजी १,००,६८१ प्रति १० ग्रॅम या नव्या विक्रमी उच्चांकावर पोहोचली. याचा अर्थ, केवळ एका आठवड्यात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ३,६४५ रुपयांनी महागला आहे.
देशांतर्गत बाजारातही सोन्याला झळाळीआता देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या दरांचा विचार करूया. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA.Com) वेबसाइटनुसार, ६ जून रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर ९८,१६३ प्रति १० ग्रॅम होता. तो गेल्या शुक्रवारी, १३ जून रोजी प्रति १० ग्रॅम ९९,०६० वर पोहोचला. म्हणजेच, एका आठवड्यात देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅम ८९७ रुपयांची वाढ झाली आहे. आज (रविवार) सोन्याचा २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर ९९,१७० रुपये आहे.
इतर कॅरेटच्या सोन्याचे दर (१३ जूननुसार)
- २२ कॅरेट सोने: ९६,६८०/१० ग्रॅम
- २० कॅरेट सोने: ८८,१६०/१० ग्रॅम
- १८ कॅरेट सोने: ८०,२४०/१० ग्रॅम
- १४ कॅरेट सोने: ६३,८९०/१० ग्रॅम
IBJA द्वारे जारी केलेले हे दर संपूर्ण देशासाठी समान असतात. सोन्याचे दागिने खरेदी करताना किंवा बनवताना तुम्हाला मेकिंग चार्जेसवर (घडणावळ) जीएसटी (GST) आणि मेकिंग चार्जेस वेगळे भरावे लागतात.
सोन्याचे दर का वाढत आहेत?सोने हे गुंतवणुकीसाठी एक सुरक्षित पर्याय मानले जाते. जेव्हा जागतिक पातळीवर कोणतेही संकट येते किंवा परिस्थिती बिघडते, तेव्हा गुंतवणूकदार आपले पैसे शेअर बाजार किंवा इतर अस्थिर मालमत्तेतून काढून सोन्यात गुंतवतात. यामुळे सोन्याची मागणी वाढते आणि त्याचे दर वेगाने वाढतात. सध्या, इस्रायल-इराण संघर्षामुळे अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे सोन्याचे दर वाढत आहेत.
वाचा - केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
या वाढत्या तणावामुळे सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.