Join us

इलॉन मस्क यांचा भारत दौरा; पीएम मोदींची घेणार भेट, Tesla प्लांटबाबत करणार मोठी घोषणा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 19:05 IST

Elon Musk: भारत सरकारच्या नवीन EV धोरणाची घोषणा झाल्यापासून Tesla भारतात येण्याची चर्चा सुरू झाली आहे.

Elon Musk India Visit: गेल्या अनेक महिन्यांपासून टेस्ला आणि स्पेस-एक्ससारख्या कंपन्यांचे प्रमुख इलॉन मस्क यांच्या भारत दौऱ्याची चर्चा सुरू होती. आता अखेर त्यांच्या भारत दौऱ्याचा मुहूर्त ठरला आहे. इलॉन मस्क या(एप्रिल) महिन्यात भारत दौऱ्यावर येत असून, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. या भारत दौऱ्यात ते भारतातील गुंतवणूकीबाबत मोठी घोषणा करू शकतात. 

मीडिया रिपोर्टनुसार, इलॉन मस्क 22 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात भारतात दाखल होतील. या दौऱ्यात ते पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर ते आपल्या भारतातातील गुंतवणूकीचा खुलासा करतील. रिपोर्टनुसार, ही भेट अत्यंत गोपनीय असेल. पंतप्रधान कार्यालय आणि टेस्लाकडून यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे. 

EV प्लांटवर 2 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक यापूर्वी असे वृत्त आले होते की, टेस्लाचे अधिकारी या महिन्यात प्रोडक्शन प्लांटी जागा पाहण्यासाठी भारतात येऊ शकतात. टेस्लाच्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये 2 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. टेस्लाची टीम त्यांच्या प्रस्तावित प्लांटसाठी योग्य जागा शोधण्यासाठी अनेक राज्यांना भेट देऊ शकते. महाराष्ट्र आणि गुजरातने टेस्लाला तेथे कारखाना उभारण्यासाठी जमिनीसह आकर्षक ऑफर्सही दिल्या आहेत. याशिवाय तेलंगणा सरकारदेखील EV मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारण्यासाठी बोलणी करत आहे. 

सरकारचे नवीन ईव्ही धोरणभारत सरकारच्या नवीन ईव्ही धोरणाची घोषणा झाल्यापासून टेस्ला भारतात येण्याची चर्चा सुरू झाली. नवीन ईव्ही धोरणानुसार, सरकारने देशात गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना सूट जाहीर केली आहे. नवीन EV धोरणात 500 मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना 5 वर्षांसाठी 15 टक्के सीमाशुल्काचा लाभ मिळेल. याचा फायदा घेण्यासाठी त्यांना 3 वर्षांच्या आत त्यांचा प्लांट भारतात उभारावा लागणार आहे. सरकारच्या या प्रोत्साहनामुळे देशात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.

टॅग्स :एलन रीव्ह मस्कटेस्लाव्यवसायभारतनरेंद्र मोदीगुंतवणूक