Join us

एकाच झटक्यात इलॉन मस्क यांचे 85,000 कोटी, तर अदानींचे 17,000 कोटी रुपये स्वाहा, असं आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 14:59 IST

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या अदानींशिवाय रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी देखील टॉप-10 श्रिमंत लोतांच्या यादीत आहेत. गेल्या 24 तासांत अंबानी यांचे 93.7 मिलियन डॉलरचे नुकसान झाले आहे.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क  (Elon Musk) आणि चौथ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी  (Gautam Adani) यांची संपत्ती एकाच दिवसात 12.41  बिलियन डॉलर्सनी कमी झाली आहे. टेस्ला आणि अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्समधील घसरणीमुळे मस्क आणि अदानींना हा मोठा झटका बसला आहे.

दोन्ही अब्जाधिशांची संपत्ती घटली - ब्लूमबर्ग बिलिअनियर इंडेक्सच्या (Bloomberg Billionaires Index) आकडेवारीनुसार, जगातील टॉप-10 श्रीमंत व्यकक्तींपैकी एक असलेले भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत एकाच दिवसात तब्बल 2.11 अब्ज डॉलर (जवळपास 17 हजार कोटी रुपये) ची घट झाली आहे. तसेच, एलन मस्क यांची संपत्ती एकाच दिवसात 10.3 अब्ज डॉलर्सनी कमी झाली (जवळपास 85 हजार कोटी रुपये) आहे. याशिवाय जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांना 5.92 बिलियनचा फटका बसला आहे. तर, लुई विटनचे बॉस बर्नार्ड अरनॉल्ट यांच्या संपत्तीला  4.85 बिलियनचा झटका बसला आहे.

अंबानी जगातील 10व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती -आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या अदानींशिवाय रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी देखील टॉप-10 श्रिमंत लोतांच्या यादीत आहेत. गेल्या 24 तासांत अंबानी यांचे 93.7 मिलियन डॉलरचे नुकसान झाले आहे. 83.6 बिलियन डॉलर नेटवर्थसह मुकेश अंबानी जगातील 10वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

टॅग्स :अदानीएलन रीव्ह मस्कव्यवसायशेअर बाजार