Union Budget
Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > होम लोन घेणाऱ्यांची चंगळ! नवीन टॅक्स रिजीममध्ये मोठे बदल होणार; पाहा बजेटमधील ५ संभाव्य घोषणा

होम लोन घेणाऱ्यांची चंगळ! नवीन टॅक्स रिजीममध्ये मोठे बदल होणार; पाहा बजेटमधील ५ संभाव्य घोषणा

Budget 2026 : यावेळी मध्यमवर्गाला अर्थसंकल्पाकडून मोठ्या आशा आहेत. तज्ञांचा असा विश्वास आहे की नवीन व्यवस्थेत काही वजावटींचा समावेश केला जाऊ शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 13:53 IST2026-01-19T13:48:51+5:302026-01-19T13:53:32+5:30

Budget 2026 : यावेळी मध्यमवर्गाला अर्थसंकल्पाकडून मोठ्या आशा आहेत. तज्ञांचा असा विश्वास आहे की नवीन व्यवस्थेत काही वजावटींचा समावेश केला जाऊ शकतो.

Budget 2026 Will Income Up to ₹17 Lakh Be Tax-Free in New Tax Regime? | होम लोन घेणाऱ्यांची चंगळ! नवीन टॅक्स रिजीममध्ये मोठे बदल होणार; पाहा बजेटमधील ५ संभाव्य घोषणा

होम लोन घेणाऱ्यांची चंगळ! नवीन टॅक्स रिजीममध्ये मोठे बदल होणार; पाहा बजेटमधील ५ संभाव्य घोषणा

Budget 2026 : १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर सवलत देऊन सरकारने नोकरदारांना मोठा दिलासा दिला होता. आता २०२६ च्या अर्थसंकल्पाकडून मध्यमवर्गीय आणि पगारदार वर्गाच्या अपेक्षा उंचावल्या असून, तज्ज्ञांच्या मते यावेळी ही करमुक्त उत्पन्नाची मर्यादा १२ लाखांवरून थेट १७ लाख रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

'न्यू टॅक्स रिजीम' ठरणार 'गेमचेंजर'
सरकारने नवीन कर प्रणालीला प्राधान्य दिले असून, सध्या ९० टक्क्यांहून अधिक करदाते याच पर्यायाची निवड करत आहेत. मात्र, गृहकर्ज घेणारे आणि ज्येष्ठ नागरिक आजही जुन्या कर प्रणालीलाच पसंती देतात. हा पेच सोडवण्यासाठी सरकार यावेळी नवीन प्रणालीत काही महत्त्वाच्या कपातीचा समावेश करू शकते.

अपेक्षित ५ मोठे बदल : नोकरदारांना कसा मिळेल फायदा?

  1. स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढ : सध्या नवीन रिजीममध्ये ७५,००० रुपयांचे स्टँडर्ड डिडक्शन मिळते. वाढती महागाई पाहता ही मर्यादा १ लाख ते १.२५ लाख रुपयांपर्यंत नेली जाऊ शकते.
  2. होम लोन आणि एज्युकेशन लोन : नवीन प्रणालीत गृहकर्जाच्या व्याजावर सूट मिळत नाही. यंदा यावर सवलत दिल्यास रिअल इस्टेट क्षेत्रालाही चालना मिळेल.
  3. हेल्थ इन्शुरन्स (मेडिक्लेम) : वाढता वैद्यकीय खर्च पाहता, नवीन टॅक्स रिजीममध्ये आरोग्य विम्याच्या प्रीमियमवर कर सवलत देण्याची जोरदार मागणी आहे.
  4. दीर्घकालीन गुंतवणूक : शेअर बाजारातील गुंतवणूक वाढवण्यासाठी लॉन्ग टर्म कॅपिटल गेन्सवरील सवलत १ लाखावरून ३ लाखांपर्यंत वाढवली जाण्याची शक्यता आहे.
  5. ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत : आरोग्य खर्च आणि मूलभूत सवलतीची मर्यादा वाढवून ज्येष्ठ नागरिकांना नवीन रिजीमकडे वळवण्याचा सरकारचा प्रयत्न असेल.

वाचा - चांदीचा 'तिहेरी' धमाका! ३ लाखांचा टप्पा पार करत चांदीने रचला इतिहास; सोनेही दीड लाखाच्या उंबरठ्यावर

१७ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त कसे होईल?

कपातीचा प्रकारअपेक्षित सवलत (₹)
मूळ करमुक्त मर्यादा१२,००,०००
स्टँडर्ड डिडक्शन १,००,००० 
होम लोन (व्याज व मुद्दल)३,५०,००० 
हेल्थ इन्शुरन्स ५०,००० 
एकूण करमुक्त उत्पन्न १७,००,००० 

 

Web Title : होम लोन लेने वालों की मौज! बजट में नए टैक्स रिजीम में बड़े बदलाव संभव

Web Summary : बजट 2026 में नए टैक्स रिजीम में बड़े बदलाव की संभावना है, जिससे कर-मुक्त आय सीमा ₹17 लाख तक बढ़ सकती है। संभावित बदलावों में मानक कटौती में वृद्धि, होम लोन ब्याज राहत और स्वास्थ्य बीमा लाभ शामिल हैं, जिससे मध्यम वर्ग के करदाताओं को लाभ होगा और रियल एस्टेट क्षेत्र को बढ़ावा मिलेगा।

Web Title : Home Loan Borrowers Rejoice! New Tax Regime Changes Expected in Budget

Web Summary : Budget 2026 may offer significant changes to the new tax regime, potentially increasing the tax-free income limit to ₹17 lakhs. Expected changes include increased standard deductions, home loan interest relief, and health insurance benefits, benefiting middle-class taxpayers and boosting the real estate sector.