Budget 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Budget 2024 : मोदी सरकारचा महिल्यांच्या आरोग्यावर फोकस, आयुष्यमान भारतची व्याप्ती वाढवणार

Budget 2024 : मोदी सरकारचा महिल्यांच्या आरोग्यावर फोकस, आयुष्यमान भारतची व्याप्ती वाढवणार

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात महिलांच्या आरोग्याशी संबंधित योजनांवर अधिक भर दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 01:13 PM2024-02-01T13:13:22+5:302024-02-01T13:14:04+5:30

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात महिलांच्या आरोग्याशी संबंधित योजनांवर अधिक भर दिला आहे.

Budget 2024 Modi government s focus on women s health will increase the scope of Ayushman bharat scheme | Budget 2024 : मोदी सरकारचा महिल्यांच्या आरोग्यावर फोकस, आयुष्यमान भारतची व्याप्ती वाढवणार

Budget 2024 : मोदी सरकारचा महिल्यांच्या आरोग्यावर फोकस, आयुष्यमान भारतची व्याप्ती वाढवणार

Budget 2024 for Women: मोदी सरकारचा अर्थसंकल्प महिलांवर केंद्रित असल्याचं दिसून आलं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात महिलांच्या आरोग्याशी संबंधित योजनांवर अधिक भर दिला आहे. महिलांच्या आरोग्य सेवेवर सरकारचं विशेष लक्ष होतं.
 

महिलांसाठी खास घोषणा
 

महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी, ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींचं लसीकरण केलं जाईल. सरकार या योजनेला प्रोत्साहन देईल. याशिवाय अंगणवाडी केंद्रे अद्ययावत करण्यात येणार आहेत. आयुष्मान भारत योजनेचा लाभ आशा वर्कर्स आणि आंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
 

१ कोटी महिला बनल्या लखपती दीदी
 

"लखपती दीदींना आणखी प्रोत्साहन दिलं जाणार आहे, लखपती दीदी योजनेचं लक्ष्य दोन कोटींवरून तीन कोटींपर्यंत वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ९ कोटी महिलांच्या आयुष्यात बदल झाला. लखपती दीदींमुळे अनेक महिला स्वावलंबी झाल्या आहेत. अंगणवाडी कार्यक्रमांना गती दिली जातेय. आतापर्यंत एक कोटी महिलांना लखपती दीदी करण्यात आलं आहे," अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. 
 

अर्थव्यवस्थेत मोठे बदल
 

"१० वर्षांमध्ये अर्थव्यवस्थेत मोठे बदल झाले आहेत. २०१४ मध्ये देश अनेक आव्हानांचा सामना करत होता. सरकारनं त्या आव्हानांचा सामना केला आणि त्यात सुधारणा केल्या. जनतेसाठी आवश्यक सुधारणा करण्यात आल्या. आमचं सरकार सामान्य लोकांच्या जीवनात बदल आणण्याची गॅरंटी घेत आहे. आम्ही प्रत्येक क्षेत्राच्या विकासाच्या संकल्पासह काम करत आहोत," असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

Web Title: Budget 2024 Modi government s focus on women s health will increase the scope of Ayushman bharat scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.