Join us

BPCL देतेय गिफ्ट व्हाउचर जिंकण्याची संधी; फक्त करावं लागेल 'इतकंच', पाहा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 18:32 IST

पाहा काय म्हटलंय भारत पेट्रोलियमनं.

सरकारी मालकीची पेट्रोलियम कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) १ हजार रुपये किमतीचे गिफ्ट व्हाउचर जिंकण्याची संधी देत ​​आहे. परंतु यासाठी तुम्हाला काही अटी शर्थींची पुर्तता करावी लागेल. दरम्यान, भारत पेट्रोलियमनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर स्पर्धा आयोजित करण्याबाबत माहिती दिली आहे. 

या स्पर्धेअंतर्गत एक प्रश्न विचारण्यात आला आहे. या प्रश्नाचे अचूक उत्तर देणाऱ्या भाग्यवान विजेत्यांना कंपनीकडून १ हजार रूपयांचं गिफ्ट व्हाउचर दिलं जाईल. इलेक्ट्रीक वाहने (EVs) हे भविष्य आहे. चार्जिंग स्टेशन्स उभारणं हा BPCL चा नवं तंत्रज्ञान स्वीकारण्याचा मार्ग आहे. या स्पर्धेचा कालावधी ३० जानेवारीपर्यंत आहे," असं भारत पेट्रोलियमनं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (BPCL) ने पुढील पाच वर्षांत ७००० आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने ३००० चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची योजना आखली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवामान बदल परिषदेत (COP-26) २०७० पर्यंत निव्वळ-शून्य उत्सर्जनाचे भारताचे लक्ष्याकडे लक्ष वेधले होते. आयओसीने या वर्षाअखेर सुमारे २ हजार चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्याच वेळी, BPCL आणि HPCL याच कालावधीत प्रत्येकी १ हजार चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची योजना आखत आहेत.

टॅग्स :भारतट्विटरइलेक्ट्रिक कार / स्कूटर