इस्त्राइल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर आशियातील अनेक तेल सधन देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. आगामी दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यात व्यक्त केली जात आहे. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. मात्र, भारतातील मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमतीवर अद्याप तरी परिणाम झाल्याचे दिसत नाही. तसेच, दुसरीकडे, आपण गॅससाठी आता केवळ कतारवर अवलंबून नाही, तर वेगळे पर्यायही शोधले जात आहेत. ऑस्ट्रेलियासहीत काही देशांनी गॅसची ऑफरही दिली आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, नजीकच्या काळातही पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता नाही. ही ग्राहकांसाठी दिलासा देणारी गोष्ट आहे.
सरकारने अशा प्रकारची रणनीती आखली आहे की, आंतरराष्ट्रीय दर कमी असताना तेल कंपन्या आपला नफा वाढवतात आणि किमती वाढल्यावर त्याचा भार स्वतः सोसून ग्राहकांचे रक्षण करतात. 'नोमुरा' या वित्तीय संस्थेच्या अहवालानुसार, सध्या तेल कंपन्या वाढीव किमतीचा भार स्वतः उचलत आहेत.
भू-राजकीय तणावामुळे 'ब्रेंट क्रूड' १६.८ टक्क्यांनी, तर 'डब्ल्यूटीआय' १४ टक्क्यांनी महागले आहे. या पार्श्वभूमीवर, भारताने पुन्हा एकदा रशियाकडून तेल आयात करण्यास सुरुवात केली आहे. आपली ९० टक्के गरज आयातीतून भागवणारा भारत मध्यंतरी मध्यपूर्वेकडून अधिक तेल खरेदी करत होता, परंतु पुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यामुळे आता रशियन क्रूड ऑईलला पसंती दिली जात आहे.
५ मार्च २०२६ चे प्रमुख शहरांतील दर -- दिल्ली: पेट्रोल ९४.७७ रुपये/लिटर, डिझेल ८७.६७ रुपये/लिटर- हैदराबाद: पेट्रोल १०७.४६ रुपये/लिटर, डिझेल ९५.७० रुपये/लिटर- बेंगळुरू: पेट्रोल १०२.९२ रुपये/लिटर, डिझेल ९०.९९ रुपये/लिटर- चेन्नई: पेट्रोल १००.८४ रुपये/लिटर, डिझेल ९२.३९ रुपये/लिटर- कोलकाता: पेट्रोल १०५.४५ रुपये/लिटर, डिझेल ९२.३९ रुपये/लिटर- लखनऊ: पेट्रोल ९४.६९ रुपये/लिटर, डिझेल ८७.८१ रुपये/लिटर- मुंबईसह इतर शहरांतही हीच स्थिती आहे...
Web Summary : Despite global crude oil price hikes due to Iran tensions, Indian fuel prices remain stable. Government strategies buffer consumers from price volatility, diversifying gas sources beyond Qatar and resuming Russian oil imports. Prices steady as of March 5, 2026.
Web Summary : ईरान तनाव के कारण वैश्विक कच्चे तेल की कीमतें बढ़ने के बावजूद, भारत में ईंधन की कीमतें स्थिर हैं। सरकार की रणनीतियाँ उपभोक्ताओं को मूल्य अस्थिरता से बचाती हैं, कतर से परे गैस स्रोतों में विविधता लाती हैं और रूसी तेल आयात फिर से शुरू करती हैं। 5 मार्च, 2026 तक कीमतें स्थिर।