Join us
Daily Top 2Weekly Top 5

आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर; जाणून घ्या, कुठे किती जणांवर कुऱ्हाड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 06:21 IST

काही दिवसांत आणखी काही कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांवर नोकऱ्या गमावण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा जाणकारांनी दिला आहे.

नवी दिल्ली : जगभरातील तंत्रज्ञान कंपन्यांनी कर्मचारी कपात सुरू केली आहे. गुगलची पालक कंपनी अल्फाबेट आपल्या ६ टक्के म्हणजेच १० हजार कर्मचाऱ्यांना काढणार आहे. चांगले काम न करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखविला जाणार आहे. काढण्यापूर्वी कंपनी कर्मचाऱ्यांना ६० दिवसांचा अवधी देणार आहे. अल्फाबेट मध्ये एकूण १.८७ लाख कर्मचारी आहेत. काही दिवसांत आणखी काही कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांवर नोकऱ्या गमावण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा जाणकारांनी दिला आहे.

कुठे किती जणांवर कुऱ्हाड? -

मेटा : सुमारे ११ हजार कर्मचाऱ्यांना काढणार ॲमेझॉन : १० हजार कर्मचाऱ्यांना काढणारसी-गेट : ३ हजार कर्मचारी काढणारलिफ्ट :  ७०० कर्मचाऱ्यांना काढलेस्ट्राइप : १,१२० लोकांना काढणारओपनडोर : ५५० कर्मचारी काढणारनेटफ्लिक्स : ५०० कर्मचाऱ्यांना काढलेएलअँडटी : ५ टक्के कर्मचारी कमी केलेटेक महिंद्रा : १.४ टक्के कर्मचारी कपातविप्रो : ६.५ टक्के कर्मचारी कमी केलेस्नॅपचॅट : १ हजार जणांच्या नोकऱ्या जाणारशॉपिफाय : १ हजार जणांना काढण्याची घोषणामायक्रोसॉफ्ट : जुलैपासून १% कर्मचारी कमीइंटेल : २० टक्के कर्मचारी काढणारट्विटर : ३,७०० कर्मचाऱ्यांना काढले, आता भारतात इंजिनीअर्स भरणार 

टॅग्स :कर्मचारीमाहिती तंत्रज्ञाननोकरीमेटाट्विटरनेटफ्लिक्स