Join us
Daily Top 2Weekly Top 5

वजन वाढलं तर केबिन क्रूचा पगार कापणार, एअर इंडियाची एअर हॉस्टेसला तंबी, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 19:06 IST

Air India News: देशातील प्रमुख विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाने आपल्या कर्मचाऱ्यांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाने नवं आरोग्य आणि तंदुरुस्ती धोरण लागू करण्याच्या दिशेने पावलं टाकण्यास सुरुवात केली असून, याचा थेट परिणाम केबिन क्रूच्या कामाचं वेळापत्रक आणि पगारावर पडण्याची शक्यता आहे.

देशातील प्रमुख विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाने आपल्या कर्मचाऱ्यांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाने नवं आरोग्य आणि तंदुरुस्ती धोरण लागू करण्याच्या दिशेने पावलं टाकण्यास सुरुवात केली असून, याचा थेट परिणाम केबिन क्रूच्या कामाचं वेळापत्रक आणि पगारावर पडण्याची शक्यता आहे. या धोरणांतर्गत बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) च्या मापदंडांच्या बाहेर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना डि-रोस्टर केले जाण्याची शक्यता आहे. एवढंच नाही तर त्यांच्या वेतनामध्येही कपात केली जाण्याची शक्यता आहे. 

हे धोरण १ मे पासून लागू होणार असून, यामध्ये केबिन क्रूच्या पात्रतेला बीएमआय रिडींग आणि फंक्शनल फिटनेसच्या  मूल्यांकनाशी जोडण्यात आले आहे. या नुसारा १८ ते २४.० पर्यंतचा बीएमआय हा सामान्य मानण्यात आला आहे. जर कुणाचा बीएमआय १८ पेक्षा कमी असेल तर त्याला अंडरवेट मानलं जाईल. मात्र अशा बाबतीत संबंधित कर्मचाऱ्याला नाकारलं जाणार नाही. पण अशा कर्मचाऱ्याला वैद्यकीय चाचणी आणि फंक्शनल मूल्यांकनामध्ये उत्तीर्ण व्हावं लागेल. तर २५ ते २९.९ पर्यंत बीएमआय असलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश ओव्हरवेट श्रेणीमध्ये करण्यात आला आहे. या श्रेणीमधील कर्मचारी फंक्शनल मूल्यांकनामध्ये उत्तीण होण्याचे प्रयत्न सुरू ठेवू शकता. मात्र ३० किंवा त्यापेक्षा अधिक बीएमआय असलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश लठ्ठपणाच्या श्रेणीमध्ये करण्यात आला असून, अशा कर्मचाऱ्यांना नव्या धोरणामध्ये अस्वीकारार्ह मानण्यात येईल. 

दरम्यान, जे कर्मचारी अंडरवेट किंवा ओव्हरवेट असतील त्यांना डि-रोस्टर करून फंक्शनल मूल्यांकनासाठी पाठवण्यात येईल. तसेच जर ते या मूल्यांकनामध्ये अयशस्वी ठरले तर त्यांना ते त्यांच्यामध्ये बीएमआयसाठी ठरवण्यात आलेल्या मर्यादेपर्यंत सुधारणा करत नाहीत तोपर्यंत विनावेतन ठेवले जाईल.  एवढंच नाही तर लठ्ठपणाच्या श्रेणीत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी त्वरित डि-रोस्टरिंग आणि वेतन रोखण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच त्यांना निश्चित मर्यादेच्या आत आपल्या बीएमआय निश्चित मर्यादेमध्ये आणावा लागेल.

याबाबत कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या संदेशामध्ये एअर इंडियाने सांगितले की,  निरोगी जीवनशैलीबाबत जागरुकता वाढवणे आणि कर्मचाऱ्यांची योग्य वजन कायम राखण्याच्या प्रकियेशी ओळख करून देणे हे हा निर्णय घेण्यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे. पुढे तंदुरुस्तीबाबत कठोर मापदंड लागू करता यावेत यासाठी सध्या हे धोरण एक तयारी म्हणून लागू करण्यात येत आहे, असे कंपनीने स्पष्ट केलं आहे. तसेच हे धोरण सक्रिय केबिन क्रूसह प्रशिक्षण घेत असलेल्या कर्मचाऱ्यासाठीही लागू होणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Air India warns cabin crew: Weight gain may cut salary.

Web Summary : Air India's new policy links cabin crew's BMI to pay and scheduling. Overweight crew may face de-rostering and salary cuts if they fail fitness assessments. The policy aims to promote a healthy lifestyle.
टॅग्स :एअर इंडियाकर्मचारीविमान