Join us

१४९९ रुपयांत देशांतर्गत कुठेही विमान प्रवास! 'या' कंपनीचा नमस्ते वर्ल्ड सेल सुरू; ऑफर किती काळ वैध?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 15:45 IST

namaste world sale : येत्या दिवसांत तुमचा विमानाने प्रवास करण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. एका विमान कंपनीने नमस्ते वर्ल्ड सेल आजपासून सुरू केला आहे.

namaste world sale : येत्या काही दिवसांत तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुमचं ट्रॅव्हलने प्रवास करण्याचं बजेट असेल तर तुम्ही त्याच पैशाता विमानाने इच्छित स्थळी पोहचू शकता. टाटा समूहाच्या एअर इंडियाने स्वस्तात प्रवास करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. एअरलाइनने आज नमस्ते वर्ल्ड सेलची घोषणा केली आहे. याअंतर्गत प्रवाशांना स्वस्त दरात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गावर उड्डाण करण्याची संधी दिली जात आहे.

केवळ १४९९ रुपयांत विमान प्रवासाची संधीकंपनी देशांतर्गत मार्गांवर इकॉनॉमी क्लासमध्ये १,४९९ रुपयांमध्ये प्रवास करण्याची संधी देत ​​आहे, तर प्रीमियम इकॉनॉमी तिकीट ३,७४९ रुपयांपासून सुरू होते. तर ९,९९९ रुपयांमध्ये बिझनेस क्लासने प्रवास करू शकता. आंतरराष्ट्रीय मार्गांवर रिटर्न तिकीट १२,५७७ रुपयांमध्ये प्रवास करता येईल. एअरलाइन प्रीमियम श्रेणीमध्ये १६,२१३ रुपये आणि बिझनेस क्लासमध्ये २०,८७० रुपयांमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासाची ऑफर देत आहे.

नमस्ते वर्ल्ड सेलचा लाभ कधीपर्यंत घेता येणार?नमस्ते वर्ल्ड सेलचा लाभ ६ फेब्रुवारीपर्यंत घेता येईल. या अंतर्गत बुकिंग केल्यानंतर १२ फेब्रुवारी ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत प्रवास करता येणार आहे. आजपासून ही विक्री केवळ एअर इंडियाच्या वेबसाइट आणि मोबाइल ॲपवर उपलब्ध आहे. यामध्ये एअर इंडियाची वेबसाइट, मोबाइल ॲप, विमानतळ तिकीट कार्यालय, ग्राहक संपर्क केंद्र आणि ट्रॅव्हल एजंट यांचा समावेश आहे. सेल दरम्यान, ग्राहक एअरलाइनच्या अधिकृत वेबसाइट आणि मोबाइल ॲपद्वारे बुकिंग करून अतिरिक्त लाभ घेऊ शकतात.

बँकांकडूनही विमान तिकिटांवर सवलतविमान कंपनीचे म्हणणे आहे की विक्रीदरम्यान, त्यांच्या वेबसाइट आणि मोबाइल ॲपद्वारे बुकिंग करणाऱ्यांना कोणतेही सुविधा शुल्क भरावे लागणार नाही. या प्रवाशांना आंतरराष्ट्रीय बुकिंगवर ९९९ रुपये आणि देशांतर्गत बुकिंगवर ३९९ रुपये अतिरिक्त बचत होतील. याशिवाय, एअरलाइनने ग्राहकांना अधिक सवलत देण्यासाठी अनेक बँकांशी हातमिळवणी केली आहे. यामध्ये आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक, फेडरल बँक आणि बँक ऑफ बडोदा यांचा समावेश आहे. या अंतर्गत ग्राहक ३,००० रुपयांपर्यंत बचत करू शकतात. याशिवाय, ग्राहक कंपनीचा प्रोमो कोड FLYAI वापरून मूळ भाड्यावर १००० रुपयांपर्यंत बचत करू शकतात.

टॅग्स :एअर इंडियाविमानपैसाटाटा