Health Insurance :आरोग्य विमा काढला की सामान्यतः आपण निश्चिंत होतो की आता उपचारांचा सर्व खर्च कंपनी उचलेल. मात्र, अनेकदा प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यावर किंवा डिस्चार्जच्या वेळी विमा कंपनीकडून क्लेम नाकारला जातो किंवा बिलात मोठी कपात केली जाते. याचे मुख्य कारण म्हणजे 'इन-प्रिन्सिपल अप्रूव्हल'कडे केलेले दुर्लक्ष. ही छोटीशी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण न केल्यास, पॉलिसी असूनही तुम्हाला लाखांचे बिल स्वतःच्या खिशातून भरावे लागू शकते.
काय आहे 'इन-प्रिन्सिपल अप्रूव्हल'?हे विमा कंपनीकडून मिळणारे एक प्रकारचे 'प्राथमिक संमती पत्र' आहे. तुम्ही हॉस्पिटलमध्ये भरती होण्यापूर्वीच कंपनी तुम्हाला लेखी स्वरूपात कळवते की, तुमचा ठराविक आजार आणि त्यावरील उपचार तुमच्या पॉलिसीमध्ये कव्हर होणार आहेत की नाही.
हे 'अप्रूव्हल' का गरजेचे आहे?
कॅशलेस सुविधेची खात्री : हे पत्र मिळाल्यास हॉस्पिटलचे बिल थेट विमा कंपनी भरते. डिस्चार्जच्या वेळी तुम्हाला पैशांसाठी धावपळ करावी लागत नाही.अटींची स्पष्टता : पॉलिसीनुसार तुम्ही कोणत्या दर्जाची खोली घेऊ शकता, हे कंपनी आधीच स्पष्ट करते. अनेकदा राजेश नावाच्या रुग्णासारखी चूक होते; त्यांनी महागडी रूम घेतली जी त्यांच्या पॉलिसीत नव्हती, परिणामी कंपनीने बिलातून मोठी रक्कम कापून घेतली.कपातीपासून बचाव : 'रिझनेबल चार्जेस' या नावाखाली विमा कंपन्या अनेकदा बिलात कपात करतात. आधीच मंजुरी घेतल्यास अशा कपातीची शक्यता कमी होते.
मंजुरी घेण्याची प्रक्रिया काय?
७२ तास आधी कळवा : जर शस्त्रक्रियेची तारीख आधीच ठरलेली असेल, तर किमान ३ दिवस आधी विमा कंपनी किंवा TPA ला कळवा.कागदपत्रांची पूर्तता : डॉक्टरांचा सल्ला, चाचणी अहवाल आणि उपचारांचा अंदाजित खर्च सादर करा.आणीबाणीच्या काळात : जर अचानक रुग्णालयात भरती व्हावे लागले, तर २४ तासांच्या आत कंपनीला कळवणे अनिवार्य आहे.
वाचा - पॅन कार्ड बनवणे आता होणार कठीण! १ एप्रिल २०२६ पासून नियम बदलणार; केवळ 'आधार' आता पुरेसे नाहीअन्यथा क्लेम नाकारला जाईल
- नेटवर्क हॉस्पिटल : तुमचे रुग्णालय विमा कंपनीच्या यादीत आहे की नाही, हे आधी तपासा. यादीबाहेरील रुग्णालयात 'कॅशलेस' सुविधा मिळत नाही.
- रुम रेंटची मर्यादा : तुमच्या पॉलिसीच्या मर्यादेतच खोली निवडा. जर तुम्ही महागडी खोली घेतली, तर केवळ खोलीचे भाडेच नाही, तर डॉक्टरांची फी आणि औषधांचा खर्चही त्याच प्रमाणात वाढवून लावला जातो, जो कंपनी नाकारू शकते.
- ICD कोडचे मिलान : बिलावर आणि अप्रूव्हल लेटरवर असलेला आजाराचा कोड एकच असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
Web Summary : Ensure 'in-principle approval' from your health insurance before hospitalization. Neglecting this crucial step can lead to claim denials and out-of-pocket expenses. Verify network hospitals, room rent limits, and ICD codes to avoid unexpected costs and ensure cashless benefits.
Web Summary : अस्पताल में भर्ती होने से पहले अपने स्वास्थ्य बीमा से 'इन-प्रिंसिपल अप्रूवल' सुनिश्चित करें। इस महत्वपूर्ण कदम को अनदेखा करने से क्लेम खारिज हो सकते हैं और अपनी जेब से खर्च करना पड़ सकता है। अप्रत्याशित लागतों से बचने के लिए नेटवर्क अस्पतालों, कमरे के किराए की सीमा और आईसीडी कोड को सत्यापित करें।