Join us  

Box Office Collection: ‘KGF 2’च्या त्सुनामीत ‘हिरोपंती 2’ व ‘रनवे 34’ची नौका बुडाली! धक्कादायक आहेत कमाईचे आकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2022 5:25 PM

Tiger Shroff Heropanti 2 and Ajay Devgn Runway 34 5 days box office collection: एकीकडे साऊथच्या सिनेमांची चलती असताना, दुसरीकडे बॉलिवूडच्या सिनेमांची बॉक्स ऑफिसवरदमछाक होताना दिसतेय. ताजं उदाहरण टायगर श्रॉफच्या ‘हिरोपंती 2’ आणि अजय देवगणच्या ‘रनवे 34’ या दोन सिनेमांचं.

Tiger Shroff Heropanti 2 and Ajay Devgn Runway 34 5 days box office collection: एकीकडे साऊथच्या सिनेमांची चलती असताना, दुसरीकडे बॉलिवूडच्या सिनेमांची बॉक्स ऑफिसवर दमछाक होताना दिसतेय. ताजं उदाहरण टायगर श्रॉफच्या ‘हिरोपंती 2’ (Heropanti 2) आणि अजय देवगणच्या ‘रनवे 34’ (Runway 34) या दोन सिनेमांचं. गेल्या शुक्रवारी बॉलिवूडचे हे दोन सिनेमे रिलीज झालेत. पहिल्याच सोमवारी हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर ‘फेल’ झालेत.

ईद सारखी मोठी संधी सुद्धा या सिनेमांनी गमावली. मंगळवारी ईदच्या दिवशी ‘हिरोपंती’नं केवळ 3.50 कोटींची कमाई केली. अजयच्या ‘रनवे 34’ने देखील इतकाच गल्ला जमवला. ईदची राष्ट्रीय सुटी असताना हे कलेक्शन फारच कमी होतं. आता बोलू साऊथच्या ‘ KGF 2’बद्दल. तर काल मंगळवारी 19 व्या दिवशी ‘केजीएफ 2’च्या हिंदी व्हर्जनने 9.57 कोटी कमवत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला.

पाच दिवसांत ‘हिरोपंती 2’ आणि  ‘रनवे 34’नं कमावले इतके कोटीपहिल्या मंगळवारपर्यंत म्हणजे पाच दिवसांत ‘हिरोपंती 2’ आणि  ‘रनवे 34’ केलेल्या कमाईचा आकडा चांगलाच निराशाजनक आहे. ‘हिरोपंती 2’नं पाच दिवसांत फक्त 18.50 कोटींचा बिझनेस केला तर ‘रनवे 34’ने 18.85 कोटींचा गल्ला जमवला.

20 दिवसानंतरही ‘केजीएफ 2’ सूसाट‘केजीएफ 2’ रिलीज होऊन 20 दिवस पूर्ण झाले आहेत. काल मंगळवारी 19 व्या दिवशी केवळ ‘केजीएफ 2’च्या हिंदी व्हर्जनने 9.57 कोटींची कमाई केली. ईदच्या दिवशी ‘केजीएफ 2’चं हिंदी व्हर्जन पाहण्यासाठी प्रेक्षकांनी एकच गर्दी केली. वर्ल्डवाईड कमाईबद्दल बोलायचं तर ‘केजीएफ 2’नं जगभरात आत्तापर्यंत 1054.85 कोटींचा बिझनेस केला आहे. यापैकी एकट्या हिंदी व्हर्जनन 382.90 कोटींचा गल्ला जमवला आहे. देशभरात या चित्रपटाने आत्तापर्यंत 752.9 कोटींची कमाई केली आहे.

 

टॅग्स :केजीएफअजय देवगणटायगर श्रॉफबॉलिवूड