Join us

भाईजानच्या सिनेमात श्रीवल्लीची एन्ट्री! सलमानच्या 'सिकंदर'ची हिरोईन बनणार रश्मिका मंदाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 12:44 IST

रश्मिकाने 'अॅनिमल' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आता श्रीवल्लीची भाईजानच्या सिनेमात एन्ट्री झाली आहे. 

रश्मिका मंदाना ही साऊथ सिनेइंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक सिनेमांमध्ये काम केलेल्या रश्मिकाला अल्लू अर्जुनच्या पुष्पा सिनेमामुळे लोकप्रियता मिळाली. पुष्पामधील श्रीवल्लीमुळे रश्मिका प्रसिद्धीझोतात आली. या भूमिकेने तिला रातोरात स्टार बनवलं. त्यानंतर रश्मिकाने 'अॅनिमल' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आता श्रीवल्लीची भाईजानच्या सिनेमात एन्ट्री झाली आहे. 

सलमान खानने काही दिवसांपूर्वीच ईदचा मुहुर्त साधत 'सिंकदर' या नव्या सिनेमाची घोषणा केली होती. या सिनेमाबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. सलमानच्या 'सिकंदर'मध्ये  रश्मिकाची एन्ट्री झाली आहे. या सिनेमात रश्मिका सलमानबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत रश्मिकाने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. "या चित्रपटाचा भाग बनवल्याबद्दल आभारी आहे", असं रश्मिकाने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

रश्मिका आणि सलमान खान पहिल्यांदाच या सिनेमाच्या निमित्ताने स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. पिंकविलाने दिलेल्या रिपोर्टनुसार, साजिद नाडियावाला यांना 'सिंकदर' सिनेमासाठी एक नवी जोडी हवी होती. त्यांनी रश्मिकाला सिनेमाची स्क्रिप्ट ऐकवल्यानंतर अभिनेत्री उत्सुक होती. 

सलमानचा 'सिकंदर' सिनेमा पुढच्या वर्षी ईदच्या मुहुर्तावर प्रदर्शित करण्यात येणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन एआर मुरुगादॉस करणार आहेत. भाईजानच्या या सिनेमासाठी चाहतेही उत्सुक आहेत. 

टॅग्स :सलमान खानरश्मिका मंदानासेलिब्रिटी