वायव्य अरबी समुद्रात वाहणाऱ्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे राज्यात मागील दोन दिवसांपासून ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. पुढील दोन दिवस राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्या उत्तर व मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज धुळे,नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.तर छत्रपती संभाजीनगर, जालना तसेच सातारा, कोल्हापुरातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उद्या (दि ९) पाच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उद्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पुणे, सातारा, जालना, नंदूरबार जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात पावसाची तीव्रता उर्वरित जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक असेल.
नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात पाऊस; द्राक्ष पंढरी पुन्हा हादरली
विदर्भासह राज्यात या भागात पुढील चार दिवस पावसाची शक्यता, कुठे यलो अलर्ट?
दरम्यान, राज्यात पुढील ३ ते ४ दिवस किमान तापमानात दोन ते तीन अंशांची वाढ होण्याचा अंदाजही आहे. विदर्भात किमान तापमानात फारसा बदल नसल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवले. बुधवारपासून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा काही भाग वगळता उर्वरित राज्यात हवामान कोरडे होण्यास सुरुवात होईल असेही सांगण्यात आले आहे.
हवामानाच्या अशाच अपडेट्ससाठी join करा 'लोकमत ॲग्रो'चा व्हॉट्सॲप ग्रूप..
https://chat.whatsapp.com/HV0xE9Q6mz4LMXStoq6Gpa