नवी दिल्ली : भारतात सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असून, यंदाच्या हंगामात आधीच अनेक भागांत अतिवृष्टीमुळे आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे भारतीय हवामान विभागाने रविवारी सांगितले.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सप्टेंबर २०२५ मधील मासिक सरासरी पाऊस दीर्घकालीन सरासरी (१६७.९ मिमी) च्या १०९ टक्क्यांपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे.
बहुतांश प्रदेशांत सामान्य ते सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल. ईशान्य व पूर्व भारतातील काही भाग, दक्षिणेकडील काही ठिकाणे, उत्तर-पश्चिम भारतातील काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे.
१ जूनपासूनचा पाऊसजून - १८० मिमी - ९%जुलै - २९४.१ मिमी - ५%ऑगस्ट - २६८.१ मिमी - ५.२%एकूण - ७४३.१ मिमी - ६%
उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन व अचानक पूर होऊ शकतात, द. हरियाणा, दिल्ली, राजस्थानात अडथळा निर्माण होऊ शकतो. - मृत्युंजय महापात्रा, महासंचालक
अधिक वाचा: 'सोमेश्वर' कारखान्याची उच्चांकी उसदराची परंपरा कायम: किती दिला अंतिम ऊस दर?