मुंबई : हवामान खात्याने वर्तविलेल्या पूर्वानुमानानुसार राज्यभरात पावसाने लावलेल्या हजेरीमुळे कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा कमी नोंदविण्यात येत आहे.
पुढील आठवड्यात राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वारे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
परिणामी, घसरलेला कमाल तापमानाचा पारा कायम राहण्याची शक्यता असल्याने उरलेला उन्हाळा तीव्र नसल्याचे संकेत मिळाले आहेत, अशी माहिती हवामान अभ्यासकांनी दिली.
वेस्टर्न डिस्टबर्न्समुळे मुंबईसह राज्यभरात पाऊस सक्रिय आहे. हवामानातील बदलामुळे हवेतील ओलसरपणा वाढत आहे. परिणामी, पुढील आठवड्यातही मुंबईसह राज्यभरात पाऊस पडेल.
राज्यभरातील अवकाळी पावसाचा जोरही पुढील तीन दिवस कायम राहणार आहे. ठिकठिकाणी पडलेल्या पावसामुळे राज्यभरातील किमान तापमानाचा पाराही घसरला आहे.
अधिक वाचा: शेतकरी म्हणतोय निम्मे उत्पन्न देतो; पण माझी शेती कोणी वाट्याने करता का?