Join us

ढग म्हणजे नेमके काय? आणि ते हवेमध्ये कसे तरंगतात? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 14:56 IST

आकाशात जमून येणारे ढग हे सुद्धा पाण्याचेच एक रूप आहे. सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावरून तसेच समुद्राच्या जलपृष्ठावरून पाण्याची वाफ होते. ती हलकी असल्यामुळे वातावरणात वरवर जाते.

आकाशात जमून येणारे ढग हे सुद्धा पाण्याचेच एक रूप आहे. सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावरून तसेच समुद्राच्या जलपृष्ठावरून पाण्याची वाफ होते. ती हलकी असल्यामुळे वातावरणात वरवर जाते.

उंच वातावरणातील थंड हवेमुळे हवेतील रेणूंची वर जाण्याची क्रिया मंदावते. या मंदगतीमुळे हे वाफेचे रेणू त्यांच्या हालचालींमुळे एकत्र येऊन ते गोठण्याची क्रिया सुरू होते. याच काळात हवेमधील सूक्ष्म धूलिकण त्याच्याभोवती जमा होऊ लागतात.

या कणांना गोठण्याचे केंद्रबिंदू असे म्हणतात. अशा प्रकारच्या अनेक सूक्ष्म कणांजवळ जमा झालेले बाष्प एकत्र येऊन त्यांचे घोस/पुंजके (droplets) तयार होतात. म्हणजेच त्यांचे ढगात रूपांतर होते.

ढगांचे प्रकार१) महाकाय किंवा प्रचंड मोठे ढगपाण्याची वाफ गोठल्यामुळे, मोठ्या प्रमाणावर ऊर्जा निर्माण होते. ती या महाकाय ढगांमध्ये साठते. परिणामी गडगडाटी आवाज होऊन विजा चमकू लागतात. कधी मोठ्या अग्निगोलकाच्या रूपाने पृथ्वीवर कोसळतात. कधीकधी मोठे तुफान किंवा चक्रीवादळ होऊ शकते.२) वेड्या वाकड्या आकाराचे काळेकुट्ट किंवा राखट काळे ढगया प्रकारच्या अतिशय मोठ्या ढगांमधून केव्हाही प्रचंड पर्जन्यवृष्टी होऊ शकते. कधी कधी हिमवर्षावही होऊ शकतो.

ढग हवेमध्ये कसे तरंगतात?- सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापत असतो. त्यामुळे, भूपृष्ठावरील हवा हलकी होऊन वरवर जात असते.- त्या वर जाणाऱ्या गरम हवेमुळे, ढगांमुळे सूक्ष्म स्वरूपातील जलकण जमिनीवर न पडता हवेत राहतात.- त्याचप्रमाणे, वादळामुळेही, जमिनीवरची गरम हवा ढगांना तरंगत ठेवण्यास मदत करते.- पाण्याची वाफ हवेतील धूलिकणांवर गोठत गेल्यामुळे अति सूक्ष्म अशा या केंद्रकणांची निर्मिती होते.- साध्या डोळ्यांनी हे कण दिसू शकत नाहीत. पण अशा केंद्रस्थानी राहणाऱ्या लाखो बाष्पयुक्त धूलिकणांमुळेच ढगांची निर्मिती होते.- धूलिकणांवरील बाष्प गोठून राहताना, स्वतःबरोबर ढगांना तरंगत ठेवण्यास मदत करते.

अधिक वाचा: आजपासून राज्यात जिवंत सातबारा मोहीम; शेतकऱ्यांना कसा फायदा होणार? वाचा सविस्तर

टॅग्स :हवामान अंदाजपाऊसपाणीतापमान