Join us

दिलासादायक: निळवंडे धरणातून प्रवरा नदीत इतक्या क्युसेक्सने विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 19:11 IST

निळवंडे धरणातून प्रवरा नदीत आजपासून विसर्ग करण्यात येत आहे.

राज्यात उन्हामुळे होरपळ असताना आणि अनेक ठिकाणी पाणी टंचाईचा सामना करावा लागत असताना निळवंडे धरण लाभक्षेत्रातील लोकांसाठी दिलासायक बातमी आली आहे.

आज शनिवारी सायंकाळी सहापासून निळवंडे धरणातून प्रवरा नदीत विसर्गाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे प्रवरा काठी असलेल्या अनेक गावांना या पाण्याचा फायदा होणार आहे.

जलसंपदा विभागाचे निवृत्त कार्यकारी अभियंता हरिश्चंद्र चकोर यांनी संकलित केलेल्या माहितीनुसार सध्या भंडारदरा धरणात ३३७५ दलघफुट(३०.५७%) तर निळवंडे धरणात निळवंडे- -२५२३ दलघफुट (३०.३२%) इतका पाणीसाठा आहे.

आज सायंकाळी सहाच्या सुमारास निळवंडे धरणातून १ हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. तर पुढील काळात टप्प्याटप्प्याने हा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याचे समजते.

टॅग्स :धरणपाणीपाटबंधारे प्रकल्प