तापमानात सातत्याने वाढ होत असून, सोमवारी (दि.१९) वर्ध्याच्या तापमानाने विक्रमी टप्पा गाठला आहे. आजचे तापमान ४६.०५ अंश नोंदवण्यात आले आहे. देशात वर्धा सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहे. आगामी काळात उष्णतेची लाट आणखी किती भयावह होते, याची भीती नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.
उन्हाचा पारा सातत्याने वाढत असल्याने हवामान विभागाकडूनही सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील दोन दिवस उष्णतेचे राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हवामान विभागाने सोमवारी जाहीर केलेल्या तापमानाच्या यादीनुसार, मध्य प्रदेशातील खजुराहो येथील तापमान सर्वाधिक ४७.०६ अंशावर पोहोचले आहे.
त्यानंतर उत्तर प्रदेशातील बंडा येथील तापमान ४६.०८ अंश तर वर्धा जिल्ह्यातील तापमान ४६.०५ अंशावर पोहोचल्याने देशातील सर्वाधिक हॉट शहरांमध्ये वर्धा तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. अजून मे महिना बाकी असून तापमानाच कोणता नवा विक्रम होतो, असा प्रश्न पडला आहे. उन्हाच्या या तडाख्यातून वाचण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे.
रात्रीचे तापमानही अधिक, नागरिक होताहेत घामाघूम
सकाळपासूनच सूर्य आग ओकायला लागत असून, ८ वाजताच तीव्र उन्हाचे चटके जाणवायला लागतात. इतकेच नाही तर रात्रीचेही तापमान वाढलेलेच असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
रात्रीचे तापमानही ३० अंशाच्या पुढे राहात असल्याने रात्री कुलरही काम करत नसल्याने नागरिक घामाघूम होत आहेत. रात्री उकाडा चांगलाच वाढत असून, ग्रामीण भागापेक्षा शहरात उकाड्याचे प्रमाण अधिक असते.
हेही वाचा : 'मधमाशी पालन' देईल साथ; ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी घ्या पुढाकार
Web Summary : Wardha recorded 46.05°C, becoming India's third hottest city. A heatwave alert is issued as temperatures rise, causing discomfort day and night. Khajuraho tops the list at 47.06°C.
Web Summary : वर्धा में 46.05 डिग्री सेल्सियस तापमान दर्ज किया गया, जिससे यह भारत का तीसरा सबसे गर्म शहर बन गया। तापमान बढ़ने से लू का अलर्ट जारी, दिन-रात परेशानी। खजुराहो 47.06 डिग्री सेल्सियस के साथ शीर्ष पर।