Join us
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाचा पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक 'हॉट', ८ दिवस राहणार तडाखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 08:51 IST

काही दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण दूर होताच तीन दिवसात विदर्भातील तापमानाचा पारा पाच अंशांनी वाढला. रविवारी अकोला जिल्ह्याचे तापमान ४३.१ अंश सेल्सिअसच्या पार गेल्याने विदर्भात अकोला सर्वाधिक गरम शहर ठरले.

काही दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण दूर होताच तीन दिवसात विदर्भातीलतापमानाचा पारा पाच अंशांनी वाढला. रविवारी अकोला जिल्ह्याचे तापमान ४३.१ अंश सेल्सिअसच्या पार गेल्याने विदर्भातअकोला सर्वाधिक गरम शहर ठरले.

त्या पाठोपाठ अमरावती, वर्धा, वाशिम या शहरांतही पारा चांगलाच वाढला होता. थंड हवेचे ठिकाण बुलढाण्याचे तापमानही ४० अंशाच्या पार गेले आहे.

दरम्यान हवामान खात्याने पुढील ८ ते १० दिवस वातावरण कोरडे व उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता वर्तवली असून उन्हाच्या झळा बसणार आहेत.

विदर्भातील तापमान

शहर तापमानशहरतापमान
अकोला४३.१ अमरावती४२.४ 
वर्धा४२.० वाशिम४१.६ 
नागपूर४१.४ चंद्रपूर४१.० 
गडचिरोली४१.० बुलढाणा४०.६ 
गोंदिया ४०.५ यवतमाळ४०.२ 
भंडारा४०.० ब्रम्हपुरी३९.६ 

अशी घ्या काळजी

तहान नसली तरी भरपूर पाणी, सरबत प्यावे, हवा खेळती राहण्यासाठी पख्यांचा वापर करावा. सैल व सौम्य रंगाचे सुती कपडे वापरावेत. शारीरिक कष्टाची कामे टाळावीत.

सावलीत थांबणे, हळुवार चालावे, टोपी, फेटा, चष्मा वापरणे, उन्हातून आल्यानंतर चेहऱ्यावर ओला कपडा ठेवावा. दुपारी १२:०० ते ४:०० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे.

हेही वाचा : मृत्युपत्र करावे की बक्षीसपत्र; नक्की फायद्याचे काय? जाणून घ्या सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Vidarbha Heatwave: Temperature Rises 5 Degrees, Akola Hottest; 8-Day Alert

Web Summary : Vidarbha's temperature surged, with Akola hitting 43.1°C, becoming the hottest city. Amravati, Wardha, and Washim also saw rising temperatures. The weather department forecasts an 8-10 day heatwave. Stay hydrated, wear light clothing, and avoid midday sun for safety.
टॅग्स :विदर्भउष्माघाततापमानअकोलाहवामान अंदाज